Funny Viral Video: हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंपैकी काही इतके मजेदार असतात की, ते लोक वारंवार पाहूनही कंटाळत नाहीत. असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर गाजतोय. या व्हिडीओने लोकांना पोट धरून हसायला आले. गंमत म्हणजे यात हत्तींचा एक संपूर्ण कळप दोन मुलींच्या स्कुटीसमोर घाबरून पळ काढताना दिसतो.
हा व्हिडीओ एक्स ( ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. त्यात दिसतं की, हत्तींचा एक कळप रस्त्याकडे सरकत असतो. एवढ्यात समोरून दोन मुली स्कुटीवरून येताना दिसतात. मुली आणि हत्ती हे एकमेकांकडे बघून काही क्षण घाबरतात. नेहमी आपल्या ताकद आणि धाडसासाठी ओळखला जाणारा हत्तींचा हा कळप त्या क्षणी थोडा घाबरतो.
या गोंधळात एक मुलगी घाबरून स्कुटी रस्त्याच्या मध्येच टाकून धावत पळते. दुसरी मुलगी मात्र स्कुटी जवळच्या एका गाडीच्या मागे लपवते. एवढ्यात हत्तींचा कळप अचानक वळतो आणि जोरात पळतो. हा प्रसंग पाहून सोशल मीडियावरील प्रेक्षक अक्षरशः खळखळून हसू लागले आहेत.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ पाहून लोकांनी भन्नाट कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. कमेंट्स सेक्शनमध्ये तर वेगवेगळ्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलं– “हत्ती कदाचित चकित झाले असतील की, कोणीच त्यांना घाबरत नाहीये. म्हणूनच ते थांबले आणि घाबरलेसुद्धा.” दुसऱ्या एका युजरची प्रतिक्रिया होती – “हत्तीही त्या महिलांना घाबरतात, ज्या त्यांच्या पुढे वाहन चालवत असतात. ”तिसरा युजर म्हणतो – “हत्तींचा कळप जर मुलींच्या ड्रायव्हिंगसमोर घाबरला, तर आपली तर काही औकातच नाही.” तर चौथ्या युजरने लिहिलं – “हा हा! खरंच, स्कूटरचा हॉर्न हत्तींचा खरा शत्रू आहे. शक्तिशाली हत्तीही जाणतात की, स्कूटर आणि मुलगी यांची जोडी काहीतरी वेगळीच आहे, त्यांच्याशी पंगा घेऊ नये.”
या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा एक जुनी गोष्ट चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे मुली स्कुटी नीट चालवत नाहीत आणि त्यांच्या स्कुटीसमोर कधी काय होईल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत की, जे ही धारणा अधोरेखित करतात. मात्र, हे फक्त लोकांचं मत असून त्यामागे प्रत्यक्षात काहीच पुरावे नाहीत.
सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, लाखो लोक हसत हसत तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हत्तींच्या ताकदीला आणि धाकाला घाबरणारे मानव आपण पाहिले आहेत; पण यावेळी गोष्ट उलट झाली – स्कुटीवरून आलेल्या दोन मुलींना पाहून हत्तींचा कळप घाबरून पळाला आणि हाच प्रसंग लोकांसाठी मनोरंजनाचा ठरला आहे.