Viral Video Inspiring Dance Performance : खेळाडू असो किंवा अगदी नोकरी करणारा, साधं जीवन जगणारा माणूस ‘आत्मविश्वास’ हा त्याच्या जीवनात खूप महत्वाचा भाग आहे. आत्मविश्वास हा महत्त्वाचा ‘हे मी करूच शकत नाही’ किंवा ‘हे मी करून तरी बघतो’ या दोन्ही विचार करण्याच्या पद्धतींमधून तुमचा आत्मविश्वास लपलेला असतो. जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर साध्यातील साधी गोष्टही तुम्हाला जमणार नाही आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टही तुम्ही अगदी मिनिटांत करून दाखवाल. असाच एक व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे; यामध्ये डान्स करताना टेबल तुटल्यामुळे चिमुकलीचा आत्मविश्वास तिच्या पाठीशी उभा राहिला आहे.

मुलींच्या ग्रुपचा डान्स पर्फोमन्स सुरु असतो. काही मुलींना टेबलावर चढून तर काही जणींना टेबलाच्या बाजूला उभं राहून डान्स करायचा असतो. प्रत्येकाच्या हातात एक वस्तू असते आणि या वास्तूच्या साहाय्याने त्यांना वेगवेगळ्या स्टेप्स करून डान्स करायचा असतो. तर डान्स पर्फोमन्स सुरु होतो आणि यादरम्यान सुरवातीलाच एका मुलीचा टेबल तुटतो आणि ती खाली पडते. अनेक जण हे पाहतात पण डान्स सुरु असल्यामुळे कोणीच तिची मदत करत नाही. पण, मग ती स्वतःच स्वतःची मदत करण्याचा निर्णय घेते.

समस्या आणि परिस्थितींना हार न मानता तोंड द्या (Viral Video)

सगळ्यातआधी ती तुटलेला टेबल जोडण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर एवढा वेळ आपल्याकडे नाही हे कळताच ती डान्स करण्यास सुरुवात करते. पण, जेव्हा बसून स्टेप करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती अगदी सुंदर पद्धतीने, टेबलशिवाय स्वतःचा तोल सावरत स्टेप करण्यास सुरुवात करते. कुठेही तिची स्टेप चुकली नाही किंवा कुठेही तिला तिची स्टेप बदलण्याची गरज पडली नाही; जे पाहून तुम्ही तिचे कौतुक करणार एवढे तर नक्की. संकटाना कसे सामोरे जायचे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

व्हिडीओ बघा…

View this post on Instagram

A post shared by Sukhvinder Singh (@sukhvindersingh199)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sukhvindersingh199 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ बघून ‘ब्युटी विथ ब्रेन’, ‘पर्फोमन्सच्या आधी एकदा टेबल तपासून घ्यायला हवे होते’, ‘हा व्हिडीओ मी खूप वेळा पहिला आणि आपल्या समस्या आणि परिस्थिती पाहून हार न मानता तोंड कसे द्यावे हे समजलं’, ‘डान्समध्ये मुख्य भूमिकेत दुसरा कोणीतरी होता. पण, मुलीच्या आत्मविश्वासाने तिला सगळ्यात शेवटी लीड रोल दिला’ ; आदी अनेक प्रेरणात्मक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.