Video Shows Grandmother Celebrating Pet Dog Birthday : हौसेला मोल नसते असे अनेकदा म्हंटले जाते आणि मानवाच्या कृतीतून ही गोष्ट अनेकदा सिद्ध सुद्धा झाली आहे. गाड्या, नवनवीन मोबाईल, कपडे तर अगदी प्राण्यांना पाळण्याची आणि त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वाढवण्याची सुद्धा अनेकांना हौस असते. त्यातच प्रामाणिक, जीव लावणारा श्वान प्राणी अनेकांचा लाडका असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये आजीने आपल्या लाडक्या श्वानाचा वाढदिवस अगदी खास पद्धतीने साजरा केला आहे.

वाढदिवस म्हणजे आयुष्यातील खास दिवस. मग हा वाढदिवस साजरा करणारी एक व्यक्ती असो किंवा १०० तो आनंद काही वेगळाच असतो. तर आज व्हायरल व्हिडीओत आजी एकटीच आपल्या श्वानाचा वाढदिवस साजरा करताना दिसली आहे. व्हिडीओत प्रचंड अंधार दिसतो आहे आणि आजी आपल्या श्वानाबरोबर बसली आहे. श्वानासाठी छोटासा केक देखील आजीने आणला आहे. एवढेच नाही तर ती एकटीच श्वानाचा वाढदिवस साजरा करताना दिसली आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

तेव्हा समोरच्या प्राण्यालाही ते प्रेम आवडते (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आजी आपल्या मुलाप्रमाणे श्वानाचा वाढदिवस साजरा करताना दिसते आहे. तिने श्वानासाठी केक आणून, त्यावर मेणबत्ती लावली. नंतर वाढदिवसाचे गाणे सुद्धा गायले, त्याच्या डोक्यावर हात ठेवून आणि त्यानंतर जोरदार टाळ्या वाजून श्वानाचा वाढदिवस खास केला. श्वानाने अनेकदा आजीला एकटेपणात नकळत साथ दिली आहे आणि तो प्रत्येक सुख-दुःखात नक्कीच तिच्याबरोबर असणार म्हणून आजीने त्याचा वाढदिवस अगदी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

व्हिडीओ नक्की बघा….

View this post on Instagram

A post shared by Tivvvvy (@tivvvvy)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा @tivvvvy हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आजीने आपल्या मुलाप्रमाणे श्वानाचा वाढदिवस साजरा केला’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. एक नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रचंड भावुक झाला आहे आणि “यालाच प्रेम म्हणतात. कारण समोर बसलेल्या श्वानाला केक कधी कापला जातो हे माहित नसते. त्याला फक्त ही गोष्ट आवडतेय की, त्याचा साथीदार, त्याच्या कुटुंबातील सदस्य (आजी), ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचे चुंबन घेत आहे. तसेच जेव्हा एखादा माणूस श्वानासाठी , कोणत्याही प्राण्यासाठी, कोणत्याही प्राण्यासाठी अशा प्रकारे प्रेम व्यक्त करतो, तेव्हा समोरच्या प्राण्यालाही ते प्रेम आवडते” ; अशी कमेंट व्हिडीओखाली केली आहे.