Viral Video : आजकाल आई-बाबा नोकरीसाठी घराबाहेर पडतात. तेव्हा घराची, मुलांची जवाबदारी ही आजी-आजोबांकडेच असते. थकले-भागलेले, तब्येतीच्या असंख्य तक्रारी सांगणारे आजी-आजोबा हळूहळू मुलांसाठी ढाल बनून उभे राहतात. त्यामुळे शाळा सोडून घरातला जास्त वेळ मुलं ही आजी-आजोबांसोबत घालवतात. म्हणूनच आजी-आजोबांची नातवांशी ओळख होणे हे आजच्या काळात महत्वपूर्ण ठरते आहे. तर आज सोशल मीडियावर या नात्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, लहान मुलांना तयार करताना ते एका ठिकाणी नीट बसत नाहीत. मग त्यांना काहीना काही सांगून, एखादे गाणं बोलून त्यांचे लक्ष दुसरीकडे वाळवून त्यांना तयार केलं जाते. तसंच काहीस आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळालं. व्हिडीओ लग्नसमारंभातील आहे. मेकअपरूममध्ये आजी नातीला तयार करताना दिसते आहे. आजी नातीला गळ्यात ठुशी घालत असते. यादरम्यान दोघीही एक ‘रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला’ हे गाणं म्हणताना दिसत आहेत. दोघींना कशाप्रकारे गाणं म्हंटल व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘हलके-हलके जोजवा…’ चिमुकलीने बांधलेल्या पाळण्यात निजलेलं श्वान बाळ पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

आजी आणि नातीचे म्हणून चांगलेच सूर जुळतात…

आजीकडून नवनवीन गोष्टी शिकण्यात नातवांना खूपच रस असतो. म्हणून हे नातं आणखीन घट्ट होत राहतं. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बहुतेक आजीने नातीला हे सुंदर गाणं म्हणायला शिकवलेलं असतं. दोघीही अगदी तालासुरात, हावभाव देत, स्टेप्स करत गाणं म्हणताना दिसत आहेत. त्यांचे गाण्याचे बोल असे आहेत की, “रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, कोणी ती तुमची जनी का फनी, तिची कशी केली वेणीफणी दळणकांडण करून गेला, लुगडी धुवायला….रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, चला जावू पुसायला” ; जे ऐकून तुम्हालाही प्रसन्न वाटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) @nickysmakeover18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आजी आणि नातीचे म्हणून तर चांगलेच जुळत असतात सूर, आजी नातीला होत नाही मुळी एकमेकांच्या पासून जाताच दूर’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच या व्हिडीओवर “प्रेम: आजी व नातं, सगळे लाड इथूनच पूर्ण होतात” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून या खास नात्याचे विविध शब्दात कौतुक करताना दिसत आहेत.