Video Shows Woman Shares How To Extract Mehndi From Stone : साखरपुडा, लग्न, डोहाळजेवण, बारसे आदी अनेक कार्यक्रमांत अगदी आवडीने हातावर मेंदी काढली जाते. सध्याच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार मेंदीमध्ये विविध चित्रेसुद्धा काढली जातात. राजस्थानी, अरेबियन मेंदी, स्टिकर मेंदी, हीना मेंदी आदी मेंदीचे विविध प्रकार उपलब्ध असतात. पण, आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या आठवणींना नक्की उजाळा येईल. व्हिडीओत एका महिलेने दगडापासून मेंदी बनविण्याची पारंपरिक पद्धत दाखवली आहे.
व्हायरल व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील आहे. एका महिलेने प्रेक्षकांना दगडापासून मेंदी बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीबद्दल सांगितले आहे; ज्यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सच्या आठवणी जाग्या झाल्या. महिलेने तिच्या बालपणीचे दिवस आठवत सांगितले की, ती आणि तिची बहीण एकत्र मेंदी बनवायच्या. तसेच बाजूला असणारा दगड दाखवीत ती विचारते, “तुम्हाला या दगडाबद्दल काही आहे माहिती आहे का?” असे विचारते आणि “याला पहाडी मेंदी म्हणतात”, असे सांगते. त्यानंतर ती मेंदीसुद्धा बनवून दाखवते.
तुम्ही कधी दगडातून मेहंदी काढून लावली आहे का (Viral Video)
व्हिडीओमध्ये रुबी ठाकूरने हिमाचल प्रदेशात कशा प्रकारे मेंदी काढली जाते याबद्दल सगळ्यांना सांगायचे ठरवले आहे. तरुणी सुरुवातीला दगडाच्या पृष्ठभागावरून मेंदी खरडवून हातावर घेते. त्यात थोडे पाणी टाकते. त्यानंतर मोठा दगड घेऊन, त्याची पेस्ट कशी बनवायची ते दाखवते. एका लहान काठीने तयार झालेली पेस्ट हाताला लावून दाखवते. त्यानंतर काही वेळ ती मेंदी तशीच ठेवते आणि नंतर पाण्याने धुऊन त्याला चढलेला रंगसुद्धा व्हिडीओत दाखविताना दिसते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thakurraveena982 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तुम्ही कधी दगडातून मेंदी काढून लावली आहे का?’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून, “आम्ही आमच्या लहानपणी याचा वापर करायचो”; तर काही जण “आम्ही या मेंदीबद्दल पहिल्यांदा ऐकलं आणि पाहिलं आहे”, असे सुद्धा आवर्जून सांगताना दिसत आहेत. तसेच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.