Viral Video Shows Daughter Hugged Her Mother With The Help Of AI : घरात पाऊल टाकताच आई दिसली नाही की, जीव कासावीस होतो. खूप टेन्शन असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी आईच्या हातांनी डोक्याला तेलानं मालिश करून घेण्यापासून ते तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपण्यापर्यंत आदी अनेक गोष्टी आपण तिच्याबरोबर करीत असतो. पण, काही जणांच्या नशिबात हे सुख नसतं. तर, सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये आईला कुशीत घेण्यासाठी एक लेक आतुर आहे. अशा वेळी एआय (AI) तिच्या मदतीला धावून आलं आहे.

आपल्या दैनंदिन जीवनातला AI चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक जण त्यांच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी एआय (AI)ची मदत घेताना दिसत आहे. तर सोशल मीडियावरील श्रद्धा नावाच्या युजरची आई काही वर्षांपूर्वी देवाघरी गेली. पण, शेवटच्या क्षणी तिला आईला भेटता आलं नाही, तिला मिठी मारता आली नाही याची खंत तिच्या मनात नेहमी होती. तर एआयच्या मदतीनं तिनं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. श्रद्धानं एआयच्या मदतीनं आईला कशी मिठी मारली ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

एका मिठीसाठी आजही जीव तरसतो

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, श्रद्धा आणि तिच्या आईच्या फोटोंचे एआयच्या मदतीनं व्हिडीओत रूपांतर करण्यात आलं आहे आणि या दोन्ही फोटोंना अशा प्रकारे एडिट करण्यात आलं आहे की, दोघी एकमेकांना मिठी मारत आहेत, असं हुबेहूब दिसतं आहे. तसेच हा व्हिडीओवर तरुणीनं मजकूर लिहिला आहे, ‘पॉईंट ऑफ व्ह्युव (POV) : आईची न मिळालेली मिठी जेव्हा एआय पूर्ण करतो. या क्षणासाठी, एका मिठीसाठी आजही जीव तरसतो.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shraddhatul_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “क्षण दुःखाचा असो की सुखाचा, आठवण येतेच. माहीत आहे ती पुन्हा कधीच दिसणार नाही… आयुष्यात कितीही पुढे निघून आलं तरी ही खंत कायम राहणार की, तुझ्या शेवटच्या क्षणी भेटता आलं नाहीच; पण, स्वप्नातसुद्धा मिठी मारता नाही आली. पण, AI मुळे मला माझ्या स्वप्नातला व्हिडीओ तरी मिळाला. मिस यू माँ”, अशी कॅप्शन तिनं व्हिडीओला दिली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक कमेंट्स करताना दिसून आले आहेत.