Video Shows Husband Give Surprise To Wife In Restaurant : काही लोकांना सरप्राईज द्यायला भरपूर आवडते. काही वेळा हे सरप्राईज खरंच आनंद देणारे ठरतात, तर काही सरप्राईज मात्र अपेक्षाभंगही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात या सरप्राईजचं आगळंवेगळं स्थान आहे. फक्त सरप्राईज देणाऱ्याची एवढीच अपेक्षा असते की, समोरच्याने खूप चांगले हावभाव देऊन आपले सरप्राईज मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये नवऱ्याने जेवताना आपल्या बायकोला खास सरप्राईज दिले आहे.

व्हायरल व्हिडीओत हा खास क्षण शूट करण्यासाठी नवऱ्याने आधीच मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग चालू करून ठेवलेले असते. नवरा आपल्या बायकोला रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेलेला असतो. बायको मुलाला घेऊन येण्याआधी नवरा रेस्टॉरंटमध्ये जेवत असतो. आपल्या बायकोचं अंगठीकडे लक्ष जावे म्हणून तो ताटासमोर बॉक्स ठेवतो आणि पुन्हा जेवण्यास सुरुवात करतो. त्यानंतर बायको आपल्या मुलाला घेऊन येते आणि तिच्या नवऱ्याशी गप्पा मारत असते. पण, तिचे अंगठीच्या बॉक्सकडे लक्षच जात नाही.

तू खरी भाग्यवान (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, बायकोचं अंगठीकडे लक्ष जावे म्हणून नवरा बॉक्स तिच्या अगदी समोर ठेवतो. पण, तिच्या हातात मुलं आणि त्यात ती नवऱ्याशी गप्पा मारत असल्यामुळे तिचे बॉक्सकडे लक्ष जात नाही. पण, काही सेकंदाने जेव्हा तिची नजर अंगठीकडे जाते तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नाही. एवढेच नाही तर ती आनंदाने नवऱ्याला मिठी मारते आणि त्याला किससुद्धा करते. त्यानंतर बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नवरासुद्धा खूश होतो.

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by ??? ???? ?????? (@thefakemediia)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thefakemediia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तिचा आनंद सगळं काही सांगून गेला’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. त्यात नेटकरी व्हिडीओ पाहून या जोडप्याची प्रशंसा करताना दिसत आहेत आणि ‘असा जोडीदार सगळ्यांना मिळावा’, ‘या दोघांना कोणाचीच नजर नको लागूदेत’, ‘तू खरी भाग्यवान’; असे कमेंटमध्ये आवर्जून म्हणताना दिसत आहेत आणि या जोडप्याने सगळ्यांच्याच चेहऱ्यावर नकळत हसू आणले आहे.