Viral Video: प्रत्येक नातवंडांच्या आयुष्यात आजी-आजोबा महत्त्वाची भूमिका बजावतात. आई-बाबांनंतर कोणी त्यांची जागा घेऊ शकेल तर ते आजी-आजोबाच असतात. बाळाचं आजारपण, आई-बाबांचे ऑफिस, तर कामानिमित्त अचानक बाहेर जायला लागणे आदी अनेक गरजेच्या वेळी आजी-आजोबा, आई-बाबांना आधार देऊन जातात. त्यामुळेच या नातवंडांनादेखील आजी-आजोबांबद्दल तितकाच आदर व प्रेम असते. तर आज सोशल मीडियावर एका असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; यामध्ये नातं तिच्या आजीचा हट्ट पूर्ण करताना दिसली आहे.

व्हायरल व्हिडीओ इटालियनचा आहे. एका इटालियन महिलेच्या आजीचं साडी प्रेम हे २० वर्षांपूर्वी सुरु झाले होते जेव्हा ती कुटुंबासह, सुट्टीत मुंबईला आली होती. येथे आल्यावर आजीला भारतीयांचे पोशाख भरपूर आवडले. आजी स्वतः एक फॅशन टेलर असल्याने ती भारतात एक महिना राहिली, फॅब्रिक विकत घेतले आणि येथील संस्कृतीचा आनंद लुटला. तेव्हापासून आजीच्या मनात साडी नेसण्याची स्वप्न होते. तर आजीच्या नातीने तिचे साडी नेसण्याची स्वप्न आज आज पूर्ण केलं आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा प्रेमळ व्हिडीओ.

हेही वाचा…रील्सच्या नादात भरकटले? रिक्षाला ओव्हरटेक करणाऱ्या त्या तरुणांचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक इटालियन महिला तिच्या आजीला साडी नेसताना मदत करत आहे. व्हिडीओमधील मजकूरात असे म्हटले आहे की, आजी २० वर्षांपूर्वी भारतात आली होती. तेव्हापासून तिला नेहमीच साडी नेसण्याचा प्रयत्न करायचा होता. तर हा प्रयत्न आणि आजीचे साडी नेसण्याचे स्वप्न आज तिच्या नातीने पूर्ण केलं आहे. अगदीच छान साडी आजीला नेसवलेली दिसते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ollyesse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आजीला साडी नेसण्याची आवड कशी लागली हे तिने कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. तसेच आजीला कसं तयार केलं याच्या एक-एक स्टेप्स सुद्धा व्हिडीओत दाखवल्या आहेत. साडी नेसल्यानंतर आजीचा आनंद गगनात मावत नाही आहे ; हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आजीची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.