Video Shows Little Girl Playing See Saw Game With Cat : मुलांना संस्कार देणे, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच अनेक जण लहान मुलांसमोर नीट बोला, नीट वागा, असे आवर्जून सांगताना दिसतात. कारण- लहान मुले मोठ्यांच्या वागण्याचे अनुकरण करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखाद्या लहान मुलाला पहिल्यांदा सी-सॉवर बसल्यावर आपण त्याला कसे खेळवतो, अगदी तसेच व्हिडीओत एक चिमुकली आपल्या छोट्याशा मांजरीच्या पिल्लाबरोबर सी-सॉचा खेळ खेळताना दिसते आहे.

सी-सॉ हा एक खेळ आहे, ज्यामध्ये दोन मुले मध्यभागी असलेल्या फळीच्या विरुद्ध टोकांवर बसतात. एक टोक वर गेल्यावर दुसरे खाली जाते. तर, आज हा खेळ चिमुकली चक्क मांजरीबरोबर खेळताना दिसते आहे. पहिल्या एका टोकावर मांजरीचे चिमुकले पिल्लू आणि दुसऱ्या टोकावर चिमुकली बसल्याचे दिसते आहे. पण, मांजरीचे पिल्लू खूपच छोटे आहे हे जेव्हा चिमुकलीला समजते तेव्हा ती खाली उतरते आणि पुढे काय करते ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, गार्डनमध्ये चिमुकली मांजरीच्या छोट्या पिल्लाबरोबर सीसॉवर बसून खेळ खेळते आहे. पण, जेव्हा पिल्लू छोटेसे आहे हे तिच्या लक्षात येते तेव्हा मात्र चिमुकली सीसॉवरून खाली उतरते आणि तिची सीट स्वतःच्या हाताने वर-खाली करते आणि मांजरीच्या पिल्लाला अगदी लहान मुलाप्रमाणे खेळवते आणि ते पिल्लूसुद्धा या खेळाचा भरपूर आनंद घेताना दिसते. तसेच व्हिडीओ पाहून या मुलीला कोणी बरं हे सगळं शिकवलं असेल एवढं तर नक्कीच तुमच्याही मनात येईल ना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंटरनेटवरचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @wildfact__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘इंटरनेटवरचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने लहान मुले आनंदी होतात आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते हे पुन्हा एकदा व्हिडीओतून सिद्ध झाले आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून चिमुकलीचे भरपूर कौतुक करीत आहेत आणि त्यांच्या मांजरप्रेमी मित्र-मैत्रिणींना या व्हिडीओच्या कमेंटमध्ये टॅग करताना दिसत आहेत.