Video Shows Husband Cries At Hospital For Wife : आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत प्रत्येक जोडप्याला त्याची काळजी असते. आई नऊ महिने वेदना सहन करते, तर बाबा आपलं मूल आपल्याशी कनेक्ट कसं राहील, आपला स्पर्श कसा ओळखेल यासाठी धडपडत असतो. यातच बाळ जन्मण्याआधी प्रसूतीवेदनांची अनेकींना भीती वाटते. त्यामुळे बाळाला जन्म देताना महिलांना किती वेदना सहन कराव्या लागतात याची जाणीव केवळ एका महिलेलाच असते. पण, आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
बायकोला बाळंतपणात, त्या नऊ महिन्यांत काय काय सहन करावे लागले याची जाणीवसुद्धा नवऱ्याला असते. तर असेच काहीसे दृश्य दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयात एका महिलेला प्रसूतीदरम्यान प्रचंड प्रसववेदना होत असतात. तर हॉस्पिटलमध्ये बायकोला होणारा त्रास पाहून बाहेर नवरा रडताना दिसतो आहे. लोकप्रिय स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उम्मुल खैर फातमा यांनी नवऱ्याचा व्हिडीओ काढून शेअर केला आहे.
बाळाला या जगात आणण्यासाठी त्याच्या बायकोला किती वेदना सहन कराव्या लागतील याची जाणीव होताच नवरा चिंताग्रस्त झाला आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोरच रडू लागला. हे पाहून डॉक्टरने त्याला विचारले, “तू तिच्यावर किती प्रेम करतोस” (कितना प्यार करत हो), प्रश्नावर रडत रडत उत्तर देत, “मी तिच्यावर खूप प्रेम करतो” (बहुत प्यार करत हूं) असे म्हणतो. हे पाहून डॉक्टर नवऱ्याचा भावूक होतानाच व्हिडीओ शेअर करून पोस्ट करतो. तुम्हीसुद्धा बघा व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ डॉक्टर उम्मुल खैर फातमा यांच्या @drnaazfatima या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “प्रत्येकाला असं प्रेम करणारा नवरा मिळायला हवा”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “ज्याला प्रसूतीवेदना कळल्या तो बाईला इज्जत द्यायला शिकला”, “नशीबवान आहेस तू, तुला असा नवरा मिळाला”, “तुझ्यासारखा नवरा प्रत्येक मुलीला मिळो” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.