Video Shows Man Grabbing Honey Bee With Bare Hands : मध हा पदार्थ सर्वच घरांमध्ये आवश्यक पदार्थ म्हणून आढळून येतो. चवीला गोड असणारा हा पदार्थ अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो आणि आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर ठरतो. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये जगण्यासाठी अन्न मिळावे म्हणून मधमाशा मधाच्या पोळ्यामध्ये तो जमा करतात. त्वचेच्या समस्या म्हणा किंवा अनेक समस्यांवर मध रामबाण उपाय ठरतो. तर हा मध काढण्यासाठी आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कामगारांना खूप मेहनत घ्यावी लागते. पण, आजचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हाला तर आश्चर्याचा धक्काच बसेल.
अनेकदा इमारती किंवा घराच्या बाहेर आपल्याला मधमाश्यांचे पोळे दिसते. हात लावण्याची गोष्ट तर लांबच राहिली. पण, आपण बघितल्यावर कानावरसुद्धा हात ठेवतो. पण, व्हायरल व्हिडीओत एक तरुण खिडकीत बसलेला दिसतो आहे. इमारतीच्या छताला एक मोठे मधमाश्यांचे पोळे दिसते आहे. तो या मधमाश्यांच्या पोळ्यापाशी जातो आणि मूठभर मधमाश्या काढून व्हिडीओ काढणाऱ्याच्या दिशेने फेकतो. यादरम्यान त्याला कोणतीही भीती किंवा इजा झाल्याचे अजिबात दिसत नाही.
मध काढण्यासाठीसुद्धा सगळेच कामगार हातमोजे घालून, उपकरणांच्या साह्याने मधाच्या पोळ्यावर जमलेल्या मधमाश्यांचा थर काढून बाजूला फेकतात. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, कोणत्याही संरक्षक उपकरणाशिवाय तो मधमाश्यांच्या पोळ्याला स्पर्श करतो आणि त्याच्या हातात काही मधमाश्या धरतो. हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल; पण तो माणूस अजिबात घाबरला नाही. तसेच आणखीन एका व्हिडीओमध्ये त्याने मधाचे पोळेसुद्धा काढून दाखवले आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओ नक्की बघा
कन्टेन्ट असा बनवा की, कोणी कॉपीच नाही केला पाहिजे (Viral Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @patel_raju_beekeepa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत; तर काही जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. “कन्टेन्ट असा बनवा की, कोणी कॉपीच नाही केला पाहिजे”, “जसा before व्हिडीओ बनवला आहेस, तसा आता after चापण व्हिडीओ बनव”, “आयुष्य जगण्याचं प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलेले दिसते आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.