Viral Video Of Bride And Groom : आपलं लग्न एकदम परफेक्ट व्हावं असे प्रत्येक जोडप्याला वाटते. म्हणून काही जण अगदी एक महिना तर कधी एक वर्ष आधीपासूनच तयारी सुरु करतात. साखरपुड्यापासून ते अगदी लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन करून ठेवतात. पण, लग्नाच्या दिवशी का होईन गोंधळ हा होतोच. अगदी जेवण अपुरे पडते, हॉलमध्ये छोटा माणसं जास्त अशी परिस्थिती ; आदी अनेक समस्या समोर येऊन उभ्या राहतात. पण, अशा परिस्थिती समजून घेणारा जोडीदार हवा असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
व्हायरल व्हिडीओ लग्नमंडपातील आहे. ज्यामध्ये दोघांची वरमाला घालण्याची विधी सुरु आहे. नवरीने नवऱ्याला वरमाला तर घातली. पण, जेव्हा नवरी वरमला घालायला जाते तेव्हा मात्र वरमाला तुटते. यादरम्यान नवरा-नवरी कोणावरही न चिडता, ह्याला-त्याला न बोलवता स्वतःच ही परिस्थिती हाताळतात.नवरा तुटलेला हार हातात घेतो, त्याला व्यवस्थित बांधतो आणि त्यानंतर ‘असं कसं जाऊ देईन तुला’ असे नवरीकडे बघत तिच्या गळ्यात वरमाला घालतो ; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
तू खूप भाग्यवान आहेस पोरी (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आपल्या गळ्यात टाकली जाणारी वरमाला तुटली आहे हे पाहून नवरीच्या चेहरा पडलेला दिसतो आहे. पण, नवरीच्या चेहऱ्यावर आनंद पुन्हा आणण्यासाठी तो वरमाला हाताने घट्ट बांधतो. त्यानंतर नवरीच्या गळ्यात टाकतो. त्यानंतर नवरीच्या चेहऱ्यावर आपली निवड योग्य आहे याचे समाधान दिसते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_.wedding_.reel या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सात वचनांपैकी एक वचन तर त्याने लग्नातच पूर्ण केले’, ‘ तू खूप भाग्यवान आहेस पोरी’, ‘असा असतो जोडीदार’, ‘मुली तू भाग्यवान आहेस’, ‘आता तुला आयुष्यभर टेन्शन घेण्याची गरज नाही’ ; ‘तुझी निवड योग्य आहे’ , देव तुमचे भले करो’ आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत. तसेच सोशल मीडियावर या व्हिडीओने सगळ्यांचे मन जिंकले आहे.