Little Vitthal Rakhumai Viral Video : शाळा, कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी तर वार्षिकोत्सवादरम्यान पहिला परफॉर्मन्स सरस्वती पूजनाचा असतो. यादरम्यान शाळेतील जे विद्यार्थी नम्रपणे उभे राहतील अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि त्यांना विठ्ठल, रखुमाई किंवा मग सरस्वतीप्रमाणे तयार करून स्टेजवर उभे केले जाते. तसेच त्यांना नेमून दिलेल्या भूमिका अगदी ते चोख पार पडतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही तर नक्कीच पोट धरून हसाल.

व्हायरल व्हिडीओनुसार (Video) संस्कार प्री-स्कूलचा वार्षिकोत्सव सुरू असतो. स्टेजवर मधोमध दोन चिमुकल्यांना विठ्ठल-रखुमाई बनवून उभे केलेले असते आणि इतर विद्यार्थी त्यांच्या मागे डान्स करत असतात. तर ‘माऊली माऊली’ हे गाणे वाजण्यास सुरुवात होते आणि सर्व चिमुकले डान्स करण्यास सुरुवात करतात. विठ्ठल-रखुमाई बनवलेल्या चिमुकल्यांना फक्त कमरेवर हात ठेवून उभे राहायचे असते. पण, जेव्हा ‘माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली’ असे फास्टमध्ये गाणे वाजण्यास सुरुवात होते, तेव्हा मात्र विठ्ठल बनलेला चिमुकला स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकला नाही. नक्की काय घडले व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडिओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, ‘माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली’ हे गाण्याचे बोल अगदी फास्ट वाजण्यास सुरुवात होते, तेव्हा इतर चिमुकल्यांना (मित्रांना) पाहून विठ्ठल बनलेला चिमुकला गाण्याच्या तालावर नाचण्यास सुरुवात करतो. हे पाहून रखुमाई बनलेली चिमुकली ‘अरे नाचू नकोस’ असे फटका मारून अगदी इशाऱ्यांमध्ये सांगते आणि स्वतः गप्प उभी राहते. तेव्हा चिमुकल्याच्या लक्षात येते की, आपल्याला नाचायचे नसते. पण, इतर मित्रांना डान्स करताना पाहून, छोटा विठ्ठल गाण्याच्या तालावर स्वतःला नाचण्यापासून थांबवू शकला नाही एवढे तर नक्की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विठ्ठलालापण रुक्मिणीच आवरते…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @marathi_memer_2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मित्रांना नाचताना बघून भावाला आवरलं नाही’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. ‘या विठ्ठलालापण रुक्मिणीच आवरते, नशीब ही रुक्मिणी रुसून गेली नाही. एक फटका मारून गप्प उभी राहिली, मुलं खरंच निष्पाप आणि निरागस असतात. खूप काही शिकवतात’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.