Video Shows Mom Give Watermelon To Blinkit Delivery Boy : उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा डिलिव्हरी बॉय प्रत्येकाच्या सेवेसाठी हजर असतात. एक वस्तू असो किंवा अनेक, बिल्डिंग असो किंवा चाळ त्यांच्या घरापर्यंत सामान पोहोचवण्याचे काम प्रत्येक डिलिव्हरी बॉय करीत असतात. त्यांना लिफ्टमधून किंवा पायऱ्या चढून आलेलं पाहून आपल्यातील अनेकांना वाईट वाटते आणि काळजीपोटी आपण पाणी हवं आहे का असेसुद्धा विचारतो. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; त्यामध्ये आई डिलिव्हरी बॉयसाठी खास गोष्ट करताना दिसली आहे.

सध्या दुपारी बाहेर पडणे म्हणजे नकोसे वाटते. त्यातच हे डिलिव्हरी बॉय सायकल, स्कुटी घेऊन पार्सल देण्यासाठी घराबाहेर पडतात. तर आज असाच एक ‘ब्लिंकिट’ (Blinkit) डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन घराबाहेर आलेला दिसतो आहे. यादरम्यान आई कलिंगड खात असते. उन्हातान्हात फिरणारा डिलिव्हरी बॉयसुद्धा थकला असेल आणि त्याला काहीतरी खायला हवे असणार याचीसुद्धा तिला कल्पना असते. तर हे लक्षात घेऊन आईने पाणी न देता डिलिव्हरी बॉयला काय दिले ते पाहा.

आईचे प्रेम शब्दात मांडणे कठीण (Viral Video)

आपल्या मुलाला भूक लागली आहे की नाही हे अगदी चेहऱ्यावरून ओळखणाऱ्या आईने आज सगळ्यांचीच मने जिंकली. डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आलेला असतो तेव्हा आई कलिंगड खात असते. मग आई पाणी न विचारता डिलिव्हरी बॉयला थेट कलिंगड खाण्यास देते. एवढेच नाही, तर दोघेही बराच वेळ कलिंगड खात गप्पा मारत असतात. हे खास दृश्य घरातील व्यक्ती पाहते आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करते, जे पाहून तुम्हालाही आईचे प्रचंड कौतुक वाटेल.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kadhak_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘आईचे प्रेम शब्दांत मांडणे कठीण, एका आईचं काळीज’ असे आईच्या प्रेमाचे वेगवेगळ्या शब्दात कौतुक करत आहेत. तसेच ब्लिंकिट कंपनीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेली आहे आणि ‘आई तर आईच असते’, अशी कमेंटसुद्धा केली आहे.