Viral Video Of Monkey : माकड हा अत्यंत हुशार; पण तितकाच खोडकर प्राणी म्हणून ओळखला जाते. माकडाने एकदा पाठलाग सुरू केला, तर सहजासहजी तो तुमची पाठ सोडत नाही, असे म्हणतात. कुठे फिरायला गेल्यावर जिथे माकडांचा वावर असतो, तिथे आपल्यासाठी मोबाईल, खाण्या-पिण्याच्या वस्तू जपून ठेवा, असे बोर्डावर लिहिलेले असते किंवा सूचना लिहिल्या जातात. पण, सोशल मीडियावर एका शहाण्या माकडाचा व्हिडीओ (Video) प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये मानवांप्रमाणेच प्राण्यांनासुद्धा जीव लावणाऱ्या माणसांची गरज असते, असे दिसून आले आहे.

व्हायरल व्हिडीओत (Video) एक अनोळखी व्यक्ती फूड स्टॉलबाहेर जेवताना दिसते आहे. तो माणूस एका कठड्यावर जेवणाची प्लेट ठेवून, खुर्चीवर बसून जेवणाचा आनंद घेताना दिसतो आहे. तितक्यात त्या कठड्यावर एक माकड येऊन बसते आणि ते त्या माणसाच्या ताटाकडे आशेने पाहते. हे पाहून तो माणूस खुदकन गालात हसतो आणि ताटातील एक पदार्थ उचलून माकडापुढे सरकवतो. ते पाहून माकड काही क्षणांसाठी इकडे-तिकडे पाहते आणि खाण्यास सुरुवात करते. अनोळखी व्यक्ती आणि माकडाचा हा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, माकडाला खाऊ घातल्यावर अनोळखी व्यक्ती जेवण्यास सुरुवात करते. त्यानंतर माकडसुद्धा हळूहळू अज्ञात व्यक्तीच्या ताटातील पदार्थ खाण्यास सुरुवात करते. त्यानंतर अज्ञात व्यक्ती माकडाजवळ आपले संपूर्ण ताट सरकवते आणि व्हिडीओचा शेवट होतो. प्राणी पाहिल्यानंतर त्यांना हाकलवून देणाऱ्यांपेक्षा प्राण्यांबरोबर एका ताटात जेवणारी माणसे मनाने खूप मोठी असतात याचे प्रात्यक्षिक आज या व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. तसेच इन्स्टाग्राम युजरने या व्हिडीओवर ‘शेअररिंग इज केअरिंग! तेही अनपेक्षित पाहुण्यांबरोबर,’ असा मजकूर दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देव तुमचे भले करो…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lefty_tomboy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. @lefty_tomboy इन्स्टाग्राम युजर या सुंदर क्षणाच्या वेळी तेथे उपस्थित होता. त्यामुळे हा क्षण त्याने रेकॉर्ड केला आणि व्हिडीओतील अनोळखी व्यक्तीला याची कल्पनासुद्धा नव्हती. पण, व्हिडीओ व्हायरल झाला आणि अखेर त्याच्यापर्यंत पोहोचला. “देव तुमचे भले करो, सर. तुम्ही जे केले ते मला खरोखरच आवडले,” असा खास संदेश त्याने त्या अनोळखी व्यक्तीसाठी लिहिला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा त्या अनोळखी व्यक्तीचे भरभरून कौतुक करताना दिसून आले आहेत.