Video Shows Mother Taking Care Of Her Daughter Bike : तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा ऑफिसमध्ये पहिल्यांदा गाडी किंवा बाईक घेण्यासाठी घरच्यांचा नकारच असतो. खर्च, ठेवायला जागा नसणार, अपघात वगैरे होण्याची भीती अशी अनेक करणे आई-बाबांच्या मनात असतात. त्यामुळे ते गाडी खरेदी करण्यास बहुतेकदा नकार देतात. पण, हीच गाडी जेव्हा घरी येते तेव्हा मात्र प्रत्येक गोष्ट आणायला त्याच गाडीवरून पाठवतात आणि गाडीची सुद्धा काळजी घेण्यास सुरुवात करतात. तर आज सोशल मीडियावर हेच दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत इन्स्टाग्राम युजर साक्षीच्या आईला तिने बाईक घ्यावी यासाठी नकार दिला होता. बाईक ऐवजी साक्षीने कार घ्यावी अशी आईची इच्छा होती. कारण – साक्षीला बाईक हाताळायला जमेल की नाही याबद्दल आईला शंका होती. पण, साक्षीची इच्छा बाईक घेण्याचीच होती. त्यामुळे तिने बाईक घेतली. पण, हळूहळू आईलाही साक्षीची बाईक आवडू लागली. पण, हे साक्षीला कसे कळले हे तुम्ही एकदा व्हायरल व्हिडीओतून बघा…

आता तिला माझी बाईक खूप आवडते (Viral Video)

साक्षी कूलन्ट टॉप-अप करण्याचा प्रयत्न करत होती. पण, कूलन्ट खूप घट्ट असल्यामुळे तिला उघडता येत नव्हते. लेक खूप वेळ प्रयत्न करतेय हे आई बघत होती. थोड्या वेळाने ती स्वयंपाकघरातील महाराष्ट्रीयन पक्कड घेऊन आली. तसेच पक्कडच्या सहाय्याने कूलन्ट टॉप-अप करण्यास मदत करू लागली. हे पाहून मुलगी भारावून गेली आणि तिने या गोष्टीचा व्हिडीओ शूट करण्याचे ठरवले.

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by sakhi (@sakhiii25)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आई अगदी बाईक जवळ खाली बसून, महाराष्ट्रीयन पक्कड हातात घेऊन कूलन्ट टॉप-अप करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. हे पाहून लेकीने व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sakhiii25 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि घडलेला प्रसंग सांगून ‘आता तिला माझी बाईक खूप आवडते’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. तसेच नेटकरी सुद्धा ‘माझ्या आईलाही कधीच वाटले नव्हते की मी हीच बाईक घ्यावी, पण आता जेव्हा मी माझ्या बाईकला कव्हर घालायला विसरते तेव्हा ती आठवणीने झाकून ठेवते’ ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.