Video Shows Owner Give First Bite Of Roti To Tempo : बाईक, स्कूटर, कार, ट्रक, टेम्पो असो किंवा अगदी सायकल; मुलांसाठी त्यांची गाडी अत्यंत प्रिय असते. कारण प्रवास करताना ही गाडीच त्याच्या बरोबर असते आणि ऊन, पावसापासून त्याचे संरक्षणसुद्धा करत असते, त्यामुळे एखाद्या सणाला गाडी स्वच्छ करून आणणे, गाडीला जरा जरी स्क्रॅच गेला तरी दुःख होणे, नवीन गाडी असताना एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याला जपणे आदी अनेक गोष्टी गाडीचा मालक करत असतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल.
व्हायरल व्हिडीओ गाडीच्या मालकाचा आहे. प्रवास करताना प्रचंड भूक लागल्यामुळे मालक हॉटेलबाहेर आपली गाडी उभी करतो, त्यानंतर हॉटेलमध्ये खाण्यासाठी जेवण मागवतो. पण, समोर जेवण येताच तो भाकरीचा पहिला तुकडा मोडतो आणि सगळ्यात पहिला स्वतःच्या गाडीकडे जातो. त्यानंतर गाडीजवळ तो हा घास ठेवतो आणि पुन्हा अन्नाचे सेवन करण्यास निघून जातो. पण, पुढे जे घडते ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की…
भाऊ घास खाली पडला म्हणजे लक्ष्मीने स्वीकार केला (Viral Video)
अनेकदा माल वाहून नेण्यासाठी, एखादी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मालक त्याच्या गाडीचा उपयोग करत असतो. अगदी मुक्कामी राहतानासुद्धा या गाडीचा झोपण्यासाठी उपयोग करतो. एवढेच नाही तर कधीकधी या गाडीत जेवणसुद्धा बनवून जेवतो, त्यामुळे या गाड्या जिवापेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात, म्हणून मालक या गाडीला लक्ष्मी मानतात. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की, जेवण सुरू करण्यापूर्वी पहिला घास मालक आधी आपल्या गाडीपुढे ठेवतो आणि काही वेळाने गाडीवरून हा घास खालीसुद्धा पडतो.
व्हिडीओ नक्की बघा
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pickup_lover_karad_wala_313 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘पहिला घास त्या लक्ष्मीसाठी, जिच्यामुळे आज मी सुखाचा घास घेतोय’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून ‘दादा इन्स्टाग्रामला पाहिलेला सर्वात छान व्हिडीओ आहे हा’, ‘भाऊ घास खाली पडला म्हणजे लक्ष्मीने स्वीकार केला’ , ‘ही गाडी कधी धोका देणार नाय शब्द आहे आपला’; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.