Viral Video Shows Pure love Between elephant and caretaker : दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नवनव्या या व्हिडीओंतून प्राण्यांच्या एकापेक्षा एक सरस गोष्टी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आपण पाहत आलोय. आता माणूस माणुसकीच्या नात्याने केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशीसुद्धा नातेसंबंध जोडण्यास सुरुवात करू लागला आहे. त्यामुळे हे प्राणीसुद्धा माणसांना आपलेसे करू लागले आहेत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये हत्ती आपल्या माहुताकडून सेवा करून घेताना दिसला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) तमिळनाडूमधील आहे. तमिळनाडूतील आदि कुंबेश्वर मंदिरातील हत्ती आणि त्याच्या माहुताचा एक खास क्षण व्हायरल होताना दिसत आहे. यातील हत्तीचे नाव मंगली आणि माहुताचे नाव अशोक कुमार असे आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, हत्ती नेहमी त्याच्या माहुताबरोबर दिसतो. माहूत हा हत्ती या प्राण्याचा स्वार, प्रशिक्षक किंवा रक्षक असतो. तर आज हत्ती त्याच्या माहुताकडून सेवा करून घेताना दिसत आहे. हत्तीने माहुताकडून नक्की कशा प्रकारे सेवा करून घेतली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…‘फॅशन का है ये जलवा’ कंबरेवर हात ठेवून चिमुकलीने केला असा रॅम्प वॉक की… VIRAL VIDEO पाहून इम्प्रेस व्हाल

व्हिडीओ नक्की बघा…

हत्ती हा तसा शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. पोटभर खाणं, झोपणं यापलीकडे तो फारसा विचार करीत नाही. फक्त जर या प्राण्याची कोणी छेड काढली, तर तो राग दाखवायलाही मागे-पुढे पाहत नाही. पण, आज हत्तीचे सेवा करून घेणारे रूप पाहायला मिळाले आहे. हत्ती माहुताजवळ त्याचा पाय पुढे करतो. मग माहूत पाय दाबून देतो आणि त्यानंतर हत्ती दुसरा पाय पुढे करतो. मग माहूत तो पायसुद्धा दाबून देतो. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की, हत्तीला कोणत्याही साखळीने बांधूनसुद्धा ठेवण्यात आलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगली आणि अशोक कुमार यांच्यातील प्रेम

सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ @ beyondthereelsiir या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मंगली आणि अशोक कुमार यांच्यातील प्रेम’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच ‘हा आहे भारत- माहूत आणि हत्ती यांच्यातील नातं पाहा’, असा मजकूर व्हिडीओवर देण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा या दोघांच्या खास नात्याचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत.