Viral Video : प्रत्येक व्यक्तीस कुठला ना कुठला छंद असतो. काहींना लग्नपत्रिका गोळा करून ठेवण्याचा छंद असतो. पत्रिकेवरील वधू-वरांची नावं कापून त्याचं प्रेझेंट पॉकेट बनवणं किंवा भेटवस्तू मिळाल्यावर त्या बॉक्समध्ये बांगड्या किंवा एखादी ज्वेलरी ठेवणं, असा छंद अनेकांना असतो. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पुठ्ठ्यांपासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत आणि त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवली आहे.

शाळेत विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं करावं, असं प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं. त्यामुळे अनेक शिक्षक मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला देतात. तर, आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यास सांगितलेले असते. या विद्यार्थ्यांनी पुठ्यांपासून इतक्या हुबेहूब वस्तू बनवल्या आहेत की, पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही एवढं नक्की. नक्की विद्यार्थ्यांनी काय बनवलं आहे ते व्हायरल व्हिडीओतून (viral video) एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…‘यात्रीगण कृपया ध्यान दे’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणारा ‘तो’ आवाज; VIRAL VIDEO पाहून आठवतील लहानपणीचे दिवस

व्हिडीओ नक्की बघा…

काय क्रिएटिव्हिटी आहे

व्हायरल व्हिडीओत (viral video) तुम्ही पाहिलं असेल की, विद्यार्थी एकामागोमाग एक रांगेत उभे असतात. एकेक करून प्रत्येक विद्यार्थी त्याने बनवलेल्या गोष्टी दाखवतो. त्यामध्ये लॅपटॉप, कॅमेरा, पट्टी, मायक्रोस्कोप, मायक्रोवेव्ह ओव्हन, टेलिफोन, स्टेथॉस्कोप, कॅलक्युलेटर, टीव्ही आणि रिमोट, रेडिओ, विमान आदी अनेक वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व वस्तूंची रचना पुठ्ठ्यापासून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अगदी बारकाईने या प्रत्येक वस्तूची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांचा अभ्यास केला आहे आणि त्यानुसार त्या वस्तू अगदी हुबेहूब तयार केल्या आहेत. त्यामुळे हे पाहून तुमच्या आश्चर्यात अधिकच भर पडेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘काय क्रिएटिव्हिटी आहे’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या वस्तूंची रचना पाहून त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. सध्या विविध कारणांनी पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी फेकून देण्यापेक्षा आपण त्यांचा असा पुनर्वापर करू शकतो.