Viral Video : आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करते तसं प्रेम कोणीही आपल्यावर करू शकत नाही. शाळा किंवा ऑफिसवरून आल्यावर पहिल्यांदा आईला आवाज देत आपण घरात पाहिलं पाऊल टाकतो. एखादी आनंदाची बातमी सांगण्यापासून ते एखाद्या संकटातून वाचवण्यापर्यंत ती प्रत्येक सुख-दुःखात आपल्या बरोबर असते. तसेच आई फक्त आपल्या मुलांसाठी नाही तर इतरांच्या मुलांसाठीही कोणतीही मदत करायला तयार असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, मेट्रोत पडलेल्या तरुणाकडे आई धावत जाताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) मेट्रोचा आहे. काही प्रवासी मेट्रोत सीटवर बसले तर काही प्रवासी उभे आहेत. बघता-बघता मेट्रोत उभ्या असणाऱ्या एका तरुणाला चक्कर येते. हे दृश्य पाहून मेट्रोत बसलेली एक आई घाबरून जागेवरून उठते आणि मुलाला उचलून सीटवर बसवते. तिला वाटतं इतर प्रवासी त्याला पाणी पिण्यास पाणी देतील. पण, कोणताच प्रवासी त्याच्या मदतीस धावून येत नाही. मग आई जागेवरून पुन्हा उठते आणि नेमकं काय करते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : आतापर्यंतचा सर्वात भारी व्हिडीओ! डान्स करताना स्पीकर बंद पडला अन्… असा पूर्ण झाला तिचा पर्फोमन्स

व्हिडीओ नक्की बघा…

शेवटी आई ती आईच…

अनेकदा ट्रेनमध्ये कोणाला चक्कर आली की, काही जण मदत कशी करू अश्या विचारात असतात, तर अनेक जण कोणताही विचार न करता मदतीस धावून जातात. तर आज व्हायरल व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. प्रवासादरम्यान एका मुलाला चक्कर आली व तो खाली पडला. यादरम्यान मेट्रोत प्रवास करणारी एक महिला आपलं लेकरू आहे असं समजून त्याच्याजवळ जाते, त्याला सीटवर बसण्यास सांगते आणि त्याला प्यायला पाणी सुद्धा देते, जे पाहून सर्वच प्रवासी एकटक त्या आईकडे बघत राहतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @asligautam_09 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘शेवटी आई ती आईच असते’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून त्या आईचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसत आहेत. अनेक जण त्यांच्या आईवरील त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत तर ज्यांनी मदत केली नाही त्यांना दोष देताना दिसत आहेत. मुलांवर कोणतं संकट आलं की आई मागेपुढे बघत नाही याचं उदाहरण आज व्हिडीओत पुन्हा एकदा बघायला मिळालं आहे.