Video Shows Three Brothers Dance On Yeh To Sach Hai Ke Bhagwan Hai song : बॉलीवूडमधील ‘हम साथ साथ हैं’ हा गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील दमदार कास्ट, उत्कृष्ट अभिनय, त्यातील गाणी यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला. संस्कार, प्रेम, लग्न, नाती, एकत्र कुटुंब काय असते हे अगदी सरळ आणि सोप्या शब्दांत मांडणाऱ्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तर सूरज बडजात्या यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मोहनीश बहल, सलमान खान, सैफ अली खान यांचे चित्रपटात दाखवण्यात आलेले आई-बाबा म्हणजेच आलोक नाथ आणि रीमा लागू यांच्यासाठी चार भावंडांनी मिळून एका खास गाणे सादर केले होते. तर आज हेच गाणे तीन भावंडांनी आपल्या आई-बाबांसाठी सादर केले आहे

तर व्हायरल व्हिडीओत (Video) ‘ये तो सच है कि भगवान है’ या गाण्यावर तीन मुलांनी आपल्या आई-वडिलांसाठी खास डान्स सादर केला आहे. आई-बाबांना समोर बसवण्यात आले आहे आणि तिन्ही भाऊ या गाण्याच्या ओळींवर आई-बाबांचे आभार मानताना दिसत आहेत. तिन्ही भावांनी या गाण्यावर सादर केलेला डान्स, गाण्याच्या प्रत्येक ओळीवर त्याचे आई-वडिलांप्रति प्रेम अगदी चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे.

आजकाल प्रत्येक जण आपला संसार करताना कुठेतरी आई-बाबांना विसरून जातात, प्रॉपर्टीसाठी आपल्या भावंडांबरोबर भांडतात आणि प्रत्येक जण आपले वेगळे कुटुंब थाटण्याच्या प्रयत्नात असतात. पण, व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, तिन्ही भाऊ किती छान एकत्र येऊन, डान्समार्फत आई-बाबांचे आभार मानताना दिसत आहेत आणि या जमलेली मंडळी या तिन्ही भावांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हालाही खूप छान वाटेल. हा व्हिडीओ हॉलमध्ये उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने शूट केला आणि सोशल मीडियावर ‘हे बघून खरंच डोळ्यांत पाणी आले’, असा मजकूर लिहून शेअर केला. एकदा पाहाच आई-बाबांसाठी तीन भावंडांनी सादर केलेला हा खास डान्स…

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कधीच कोणी आपले संस्कार विसरणार नाही…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @marathi_wedding_55 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘अशी जर पिढी चालत राहिली तर कधीच कोणी आपले संस्कार विसरणार नाही. कारण जे मोठे करतात तेच लहान करतात’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत आणि ‘व्हिडीओ पाहून खरंच डोळे भरून आले’, ‘खुप छान आहे व्हिडीओ मला तर सारखं सारखं बघावासा वाटतोय’, ‘आई बाबा ज्यांच्याबरोबर आहेत तो मुलगा खरोखर नशिबवान असतो’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.