Video Shows friends Reunite With Wholesome Twist : मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय निभावलं जात. जेव्हा संपूर्ण जग तुमच्याविरोधात उभं असतं, तेव्हा मित्रच आपल्या बाजूने ठामपणे उभा असतो. मग आपली चूक असो किंवा नसो. सर्वांनाच जीवनात असा एक मित्र हवा असतो; ज्याच्याबरोबर आपण जसे आहोत तसे आपल्याला वागता आले पाहिजे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये दोन मित्रांमधील खास बॉण्डिंग पाहायला मिळाले आहे.
व्हायरल व्हिडीओत विशाल आणि त्याच्या आईने जबरदस्त अभिनय करण्याचा प्लॅन केलेला असतो. विशाल आणि त्याचा मित्र बाहेर जाणार असतात. विशालला बरोबर घेऊन जाण्यासाठी मित्र त्याच्या घरी जातो. आईने दरवाजा उघडताच “विशाल नाही आहे का?” असे मित्र विचारतो. “विशाल नाही आहे घरी” असे आई म्हणते. मग विशालची वाट बघत तो घरात फेऱ्या मारत असतो. तितक्यात विशालची रूममधून एंट्री होते. विशालला बघून मित्र कशाप्रकारे रिॲक्ट करतो एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
काकूंनी खूप मस्त अभिनय केला (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, विशालची आई विशाल घरी नसल्याचे सांगून मित्राची शाळा घेत असते. विशाल अजून घरी आलाच नाही, तो घरी नाही आहे असे मित्राला सांगते. त्यामुळे विशालची वाट बघत मित्र घरात फेऱ्या मारत असतो. तितक्यात रूममधून विशालची एंट्री होते. विशालला बघताच मित्र त्याच्याकडे धावत जातो. दोघेही एकमेकांना बघून जोरात ओरडताना आणि मिठी मारून नाचण्यास सुरुवात करतात; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @indiawithoutpolitic आणि @filmywriter_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भरपूर आनंदी झाले आहेत आणि “हे पाहून मन आनंदी झाले. आजकाल अशी मैत्री मिळणे दुर्मिळ आहे”, “मित्रांना बाहेर पाठवण्यापूर्वी त्यांच्या आईंनी आपल्याशी अशी मस्करी करणे गरजेचे असते का”, “काकूंनी खूप मस्त अभिनय केला” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत…