Video Shows Zomato Delivery Agent Gets Surprise Birthday Party : ऊन, पाऊस असो किंवा पावसाळा कोणत्याही ऋतूत काम करणारे आणि तुमच्या घरापर्यंत सामान पोहचवण्याचे काम फक्त डिलिव्हरी बॉय करतात. अनेकदा दमून आलेल्या डिलिव्हरी बॉयला आपण पाणी विचारतो आणि पार्सल देऊन जाताच त्यांना धन्यवाद सुद्धा म्हणतो. पण, आज यापेक्षा पण काहीतरी खास आज एका कुटुंबाने डिलिव्हरी बॉयसाठी केलं आहे; जे पाहून तुमचेही मन नक्कीच भारावून जाईल.
कृष्णा रत्नानी या इन्स्टाग्राम युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. झोमॅटोकडून पार्सल आल्यानंतर सगळ्यांना समजते की, डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस आहे. मग, कृष्णा रत्नानी यांच्या घरातील काही सदस्य मिळून काहीतरी खास करण्याचे ठरतात. डिलिव्हरी बॉयच्या डोळ्यावर हात ठेवून त्याला घरात घेऊन जातात. त्यानंतर सगळे मिळून वाढदिवसाचे ‘हॅप्पी बर्थडे’ गाणे गातात. पण, या दरम्यान ते डिलिव्हरी बॉयसाठी केक आणत नाहीत. तर एक विशेष गोष्ट खायला देऊन वाढदिवस साजरा करतात.
माणसांनी माणसांशी माणसासारखं वागणं (Viral Video)
कोणताही केक न कापता किंवा मेणबत्ती न फुकता डिलिव्हरी बॉयसाठी ग्राहक वाढदिवसाचे गाणे म्हणून, डार्क फँटसी बिस्कीट भरवून त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. सगळ्यांचे आपल्या प्रति प्रेम, आदर आणि वाढदिवस साजरा करतानाच उत्साह पाहून डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो. सध्या आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात एकमेकांना विनाकारण मारहाण केली जाते. पण, आज व्हायरल व्हिडीओत माणसांनी माणसांशी माणसासारखं वागणं इतकं सोपं आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच..
व्हिडीओ बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @krsnaratnanii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आमच्या झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या बॉयचा दिवस खूप प्रेमाने गेला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयल नियमित ऑर्डरच्या पैशांविरुद्ध काहीतरी वेगळं मिळाले; ज्या ग्राहकांना तो डिलिव्हरी करत होता त्याच ग्राहकांनी त्याचा वाढदिवस साजरा केला; जे पाहून तुम्हीही भारावून जाल एवढं तर नक्की…