Sister Surprises Her Brother Viral Video : आई-वडील, आजी-आजोबा यांच्या नात्यापेक्षा वेगळे भाऊ आणि बहिणीचे नाते असते. ज्या गोष्टी सहसा आपण कोणाला सांगू शकत नाही, त्या गोष्टी इथे अगदी मोकळेपणाने बोलता आणि सांगता येतात. एकमेकांशी सतत भांडणारे, पण गरज लागल्यावर एकमेकांसाठी हक्काने धावून जाणारेसुद्धा हेच असतात. अनेकदा रक्षाबंधनला भावाकडून महागड्या गिफ्टची अपेक्षा ठेवणारी बहीणसुद्धा भावाच्या भविष्याच्या, त्याच्या आवडीनिवडीचा विचार करत असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
भरत नावाच्या लाडक्या भावासाठी बहिणीने मोबाईल खरेदी केला आहे. हा फोन घेऊन ती भावाच्या जवळ जाते. त्याच्या हातात बॉक्स देते. बॉक्स हातात घेतल्यावर भाऊ एकटक त्या बॉक्सकडे बघत राहतो. पूर्ण बॉक्स उघडून मोबाईल हातात घेत नाही, तोपर्यंत त्याला बहिणीने मोबाईल दिला आहे या गोष्टीवर विश्वासच नसतो. अखेर तो बॉक्स उघडतो आणि फोन आहे हे पाहता क्षणी त्याच्या डोळ्यांत पाणी येते. कोणी बघू नये म्हणून तो डोळ्यांवर हात ठेवतो. पण, शेवटी बहीण ती बहीण. तिने ही गोष्ट लगेच बघितली आणि लाडक्या भावाला चिडवण्यास सुरुवात केली.
सरप्राईज गिफ्ट म्हणून मोबाईल दिला (Viral Video)
लहान भाऊ असल्यामुळे त्याला कदाचित बहिणीसाठी काहीच करता आले नाही किंवा त्याने कधी बहिणीकडे कोणतीच गोष्ट पाहिजे असा हट्टसुद्धा केला नाही. पण, मोठ्या बहिणीपासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, बहिणीने सरप्राईज गिफ्ट म्हणून मोबाईल दिलेला पाहून लाडका भाऊ भारावून गेला आहे. डोळ्यावर हात ठेवत आश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असला तरीही बहिणीने त्याला रडताना पाहिले. भावा-बहिणीच्या नात्यातला हा सुंदर क्षण व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @indiawithoutpolitics या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “बहिणीने अनपेक्षित भेटवस्तू देऊन सरप्राईज दिल्यानंतर भाऊ रडला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “मी त्या भावाची भावना समजू शकते. तो रडत आहे, कारण भाऊ बहिणीसाठी आत्तापर्यंत काहीच करू शकला नाही. तू एक दिवस नक्कीच तिच्यासाठी काहीतरी करशील”, “बहिणीचे मन खूप मोठे असते”, “व्हिडीओ पाहून मलाही रडायला आले” आदी कमेंट्स नेटकरी करत आहेत.