Viral Video: साप आणि मुंगूस यांच्यात जन्मोजन्मीचे वैर आहे. एकमेकांचे शत्रू असणारे हे दोघे जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाणार हे निश्चित असते. या लढाईमध्ये एक जीव वाचवण्यासाठी, तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतो. त्यात साप हा अतिशय विषारी प्राणी आहे, ज्याच्या दंशाने मनुष्याचा नाही, तर प्राण्याचाही उपचारांअभावी मृत्यू होऊ शकतो; पण मुंगुसासमोर त्याचं काहीच चालत नाही. कारण मुंगूसाला आपल्या धारधार दातांनी सापाला गंभीर जखमी करु शकतो. तसेच मुंगूस सापापेक्षा चपळ असतो. जो सहस उड्या मारुन सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करु शकतो. त्यामुळे मुंगूस मृत्यूची पर्वा न करता, सापाशी भिडतो. सध्या सोशल मीडियावर साप आणि मुंगुसाच्या लढाईचा असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रुत्वामागे अनेक कारणं दिली जातात. मुंगूस त्याच्या पिल्लांच्या रक्षणासाठी सापावर हल्ला करतो. सापाला त्याच्याशी लढायचे नसते; पण स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी जंगलात लढावे लागते. यात मुंगूसाच्या चपळतेपुढे सापाचे काहीच चालत नाही. आता व्हायरल असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, साप रस्त्यावर आपला फणा पसरून बसला आहे. पण, सापाला पाहताच मुंगूस चवताळतो आणि धावत येऊन थेट हल्ला करतो. मुंगूस सापाची मान पकडण्याचा प्रयत्न करतो; पण साप बचावासाठी आक्रमक होताना दिसतो. दोघेही आपाआपल्या बाजूने चांगलेच बळ लावताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
साप आणि मुंगुसाच्या लढाईचा हा थरकाप उडविणारा व्हिडीओ युट्यूबवरील @DogForceCat नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, यावर अनेक लाइक्स आणि व्ह्यूज मिळाल्या आहेत. तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “बापरे खूपच खतरनाक”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “कोण जिंकली शेवटी?”