Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओही पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असंच काही पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

आपल्या आयुष्यातील संकटांपासून अनेक जण दूर पळून जातात; तर काही जण समोर दिसणाऱ्या संकटांसमोर हार न मानता, त्यांना सामोरे जातात. हाच गुण माणसाला आयुष्यात खूप यशस्वी बनवतो. मनातील भीती दूर करणं हे आयुष्यातील मोठं यश आहे. हा गुण फक्त माणसांमध्येच नाही, तर अनेक प्राण्यांमध्येही पाहायला मिळतो. अनेक प्राणी समोर दिसणाऱ्या हिंस्र प्राण्यांपासून दूर न पळता, उलट आपल्या युक्तीच्या जोरावर हिंस्र प्राण्यांनाच दूर पळवतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक माकड असंच काहीतरी करताना दिसतोय.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलामधील तळ्यातला असून, यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड तळ्यात असणाऱ्या झाडाच्या फांदीवर उड्या मारत आहे. यावेळी त्याच तळ्यामध्ये चार वाघ पोहताना दिसत आहेत. यावेळी ते माकड वाघ आपली शिकार करतील याची पर्वा न करता, ते तळ्यातील झाडाच्या फांदीवरून खाली वाकून काहीतरी खायला मिळतंय का ते पाहत आहे. तर, पाण्यातील वाघ समोरील माकडाचा कसा फडशा साधता येईल, यासाठी संधीची वाट पाहत आहेत. पण, वाघांना त्या माकडाची शिकार करणे काही शक्य होत नाही.

हेही वाचा: ‘शेतकऱ्याच्या मुलाचा स्वॅग…’ मालकाला भेटायला म्हैस कॉलेजमध्ये पोहोचली; VIDEO पाहून पोट धरून हसाल

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @motivationalmans7 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत पाच हजारांहून अधिक व्ह्युज आणि काही लाइक्स मिळाल्या आहेत. दरम्यान, याआधीदेखील अशा प्रकारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात हिंस्र प्राण्यांना इतर प्राण्यांनी आपल्या युक्तीच्या जोरावर पळवून लावले होते.