Father And Son Relationship Viral Video : आई-बाबांमध्ये बाबा नेहमीच कठोर असतात असे समजले जाते. त्यामुळे अनेकदा बाबा आणि मुलांमध्ये प्रचंड वाद होतात. असे असले तरीही कुटुंबाला पहिले प्राधान्य देऊन बाबा सगळ्यात शेवटी स्वतःला ठेवतात. मग ती कपडे, खाण्या-पिण्याची गोष्ट किंवा एखादी वस्तू असो. पण, बाबांनी आपल्यासाठी केलेला त्यागही प्रत्येक लेकराला दिसत असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये लेकाने बाबांचे स्वप्न अगदी खास पद्धतीने पूर्ण केले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये अश्विनला बाबांना सरप्राईज द्यायचे असते. १४ वर्षांपूर्वी बाबांनी अश्विनला त्यांना बुलेट घ्यायची आहे असे सांगितले होते. त्यांच्याकडे बुलेट घेण्याची संधी देखील आली. पण, घरखर्च, कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी, शिक्षणाचा खर्च या सगळ्यात त्यांचे बुलेट घेण्याचे स्वप्न कुठेतरी राहून गेले होते. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देऊन, स्वतःच्या आवडीनिवडींना नेहमीच मागे ठेवले. पण मुलाने ही गोष्ट लक्षात ठेवून बाबांना एक खास सरप्राईज दिले आहे.
त्यांना बुलेट खरेदी करायची होती (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, अश्विन स्वतःसाठी बुलेट घेतोय असे सांगून आई आणि बाबांना शो-रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर नवीन बुलेटची चावी वडिलांना देताना दिसतो. ही बाईक त्यांच्यासाठीच असते याबाबत त्यांना कल्पना नव्हती. पण, लेकाने सांगितल्यानंतर बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आई भावनिक झाली आणि बाबांनी मुलाला मिठी मारली. बाईक विकत घेण्यासाठी सगळ्या कागदपत्रांवर सही केल्यानंतर लेक बाबांना बुलेटवर बसण्यास सांगतो. त्यानंतर बुलेट शो-रूम बाहेर घेऊन येतात आणि आईला देखील बुलेटवर बसवतात.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ashwin.os या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “१४ वर्षांपूर्वी त्यांनी मला सांगितले होते की, त्यांना बुलेट खरेदी करायची आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांच्याकडे बुलेट घेण्याची संधी होती. पण, त्यांनी कधीच नाही घेतली. कदाचित त्यांनी स्वतःला कधीच प्राधान्य दिले नाही. आज मी त्यांना एक गोष्ट दिली जी त्याला नेहमीच हवी होती. हे तुझ्यासाठी आहे, बाबा” ; अशी कॅप्शन लेकाने या व्हिडीओला दिली आहे.