Viral Video ST Bus Driver Assault : पावसाळा जितका मनाला आनंद देऊन जातो, तितकाच तो माणसाच्या आयुष्यात छोटे-मोठे त्राससुद्धा घेऊन येतो. खूप पाऊस पडल्यामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साठणे, रस्त्यांवरचे खड्डे आणि त्या खड्ड्यांत साठणारे पावसाचे पाणी यामुळे तर ऑफिस, कॉलेज, क्लासला जाणाऱ्या लोकांसमोर एक वेगळेच संकट उभे राहते. चुकून एखादी गाडी आली आणि कपड्यांवर पाणी उडाले की, त्या गाडीचालकाला आपण ‘अरे, दिसत नाही का’ एवढं तर आपण रागात नक्कीच बोलून जातो. पण, या छोट्या कारणामुळे तुम्ही एखाद्या गाडीचालकाला मारायला जाल का? नाही ना…
पण, आज व्हायरल व्हिडीओत तसेच काहीसे घडले आहे. एक माणूस रस्त्यावरून जात असताना त्याच्या बाजूने एसटी बस गेली आणि चिखल त्या व्यक्तीच्या अंगावर उडाला. मग त्याने एसटी बस थांबवून, त्या एसटी चालकाला उतरवून, त्याला मारण्यास सुरुवात केली. एसटी चालकाची अवस्था बघून तिथे नक्की काय घडलं असेल याचा अंदाज तुम्हाला व्हिडीओ बघून नक्कीच आला असेल.
ड्रायव्हर पाणी बघून गाडी चालवणार का? (Viral Video)
अनेकदा गाडीत कोण कोणत्या अवस्थेत बसलं किंवा उभं आहे, रस्त्यावर किती स्पीड ब्रेकर व खड्डे आहेत याचा अंदाज न घेता चालक अगदी सुसाट एसटी बस चालवतात. त्यामुळे याचा परिणाम प्रवाशांना व रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांना भोगावा लागतो, ज्याचे उदाहरण तुम्ही या व्हिडीओत बघितले. पण, यावर उपाय फक्त मारणे किंवा भांडण करणे नसून, एखादी गाडी जर वेगाने येत असेल, तर आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी पाण्याने साचलेल्या खड्ड्यांपासून थोडे लांब उभे राहावे किंवा अशा चालकांना गाडी कमी वेगात चालवण्याचा सल्ला द्यावा, असा उपाय प्रत्येकाने करावा म्हणजे व्हिडीओसारखी परिस्थिती उदभवणार नाही.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DNiy2DbS22c/?igsh=b3NiM2tpcmowOGI5
हा व्हिडीओ खुद्द एसटी चालकाने शेअर केला आणि “दुर्दैवी गोष्ट आहे की, मी एक एसटी कर्मचारी आहे आणि रोडवर खड्डे आहेत आणि खड्ड्यातील पाणी अंगावर उडाले. म्हणून मार खावा लागत आहे”, असा मजकूर व्हिडीओवर लिहिला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @@rakesh_h_suryavanshi इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत आणि “कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, हाच एसटी कर्मचारी दिवसरात्र सेवा करीत होता”, “एसी ड्रायव्हरचा रस्ता नाही आहे. सरकारनं त्या रस्त्याचं काम केलेलं नाही आहे. दम असेल, तर सरकारशी भांडा”, “ह्यामध्ये ड्रायव्हरची काहीच चूक नाही”, “मूर्ख माणसा, ड्रायव्हर पाणी बघून गाडी चालवणार का”, तर अनेक जण, “त्या माणसाचं काहीच चुकलं नाही. चांगला चोप दिला. तुम्ही एसटी आणि ट्रकवाले किती चांगली ड्रायव्हिंग करता, सगळ्यांनाच माहिती आहे” आदी अनेकविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच एका युजरने या प्रकरणात मध्यस्थीच्या दृष्टीने, “यात खरं सांगायचं म्हटलं तर बसवाल्यानं पण वाहन थोडं सावकाश चालवावं आणि या माणसानं पण मारायला नव्हतं पाहिजे. बोलून गोष्टी मिटवता आल्या असत्या”, असे म्हटले.