Fact Check Of Viral Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये भूमध्य समुद्रात (भूमध्य समुद्र म्हणजे मेडिटेरियन सी; जो हा युरोप, आफ्रिका व आशिया या खंडांनी वेढलेला एक आंतर्देशीय समुद्र आहे) एक विचित्र घटना घडत असल्याचा दावा करण्यात आला होता. समुद्रातील लाटा बाहेर येऊन समुद्राच्या मध्यभागीच त्याचे मोठे खड्डे तयार होताना दिसत आहेत. पण, तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ एआय-जनरेटेड आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @iamSaharEmami सहार इमामी यांनी एक व्हिडीओ शेअर केला.

इतर युजर्ससुद्धा हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत…

https://www.instagram.com/p/DLwGy3Tu2wA

https://www.facebook.com/Lawi59/videos/1067826162123967

https://www.facebook.com/share/p/1D7QW8aeDf

तपास:

आम्ही व्हिडीओचा तपास सुरू केला आणि InVid टूलवर अपलोड करून आणि त्यातून मुख्य फ्रेम्स काढून. त्यानंतर आम्ही त्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.

आम्हाला हा व्हिडीओ ‘dr.vea’ नावाच्या TikTok प्रोफाइलवर अपलोड केलेला आढळला. व्हिडीओ बनवणाऱ्याने व्हिडीओवर ‘AI-जनरेटेड’ असे लेबल लावले होते.

Fact Check Of Viral Video

आम्ही त्याचे प्रोफाइल तपासले आणि आम्हाला आढळले की, युजर नेहमीच ए-आय जनरेटेड व्हिडीओ पोस्ट करीत असतो.

Fact Check

त्यानंतर आम्ही व्हिडीओ एआय डिटेक्टरमधून तपासले. तेव्हा , “व्हिडीओ एआय-जनरेटेड किंवा डीपफेक कन्टेन्ट असण्याची शक्यता आहे” ; असे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
AI generated viral video

निष्कर्ष – समुद्राच्या मध्यभागी लाटा उसळून, त्याचे मोठमोठे खड्डे तयार होत आहेत, असे दाखविणारा व्हायरल व्हिडीओ एआय-जनरेटेड आहे. त्यामुळे हा व्हायरल होणारा व्हिडीओ खोटा आहे…