Viral Video Student Sing Shree Ganeshaya Dheemahi Song In school : एखादी कला तुमच्याकडे असेल तर ती कला दाखवण्यासाठी तुम्हाला मोठ्या रंगमंचाची गरज नसते. शिवणकामाची आवड असणारे घरी छोट्या वस्तू बनवून, सोशल मीडियावर तर हॉटेल न उघडता त्यांना बनवता येणाऱ्या पदार्थांचा स्टॉल उघडून ग्राहकांना विकू शकतात. फक्त तुम्ही कला इतरांसमोर सादर तर करा ; तुम्ही इतरांचे मन जिंकेलच म्हणून समजा… असेच काहीसे आज एका चिमुकल्याने केलं आहे.
व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. शाळेत कार्यक्रम सुरु असतो. यादरम्यान एका विद्यार्थ्यांच्या हातात माईक देण्यात आलेला असतो. माईक हातात दिल्यावर तो “श्रीगणेशाय धीमही” गाणे गाण्यास सुरुवात करतो. चिमुकल्याचा सुरेल आवाज ऐकून तुम्हाला वाटेल की, एखादा गायकच गात आहे. शिक्षिका सुद्धा चिमुकल्याचा गाणे ऐकायला खुर्चीवर येऊन बसल्या आहेत आणि शिक्षक तर अगदी चिमुकल्याकडे एकटक बघत आहेत.
मराठी गायन क्षेत्रात तुझं नाव मोठं होवो… (Viral Video)
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे छंद, कला जाणून घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास सांगितले जाते. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, चिमुकला सुद्धा एका कार्यक्रमा दरम्यान हातात माईक घेऊन, अगदी भक्तिभावने, हावभाव देत, मधुर आवाजात गाणं गात आहेत आणि या विद्यार्थ्याचा आवाज ऐकून सगळेच थक्क झाले आहेत…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @its_me_golu_123 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “टॅलेंटला कुठल्या मोठ्या व्यासपीठाची आवश्यकता नसते” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा या हुशार विद्यार्थ्यांचे कौतुक करत “खुप छान आवाज आहे”, “खूप छान बेटा शिकून खूप मोठा हो मराठी गायन क्षेत्रात तुझं नाव मोठं होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना”, “अतिशय सुंदर बाळा खूप छान. गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने खूप मोठा हो” ; आदी अनेकविध कमेंट्स करताना दिसत आहेत