Heartfelt Teacher Farewell Viral Video : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अगदी वही आणि पेनासारखे असते. वही शिवाय पेनाचा काही उपयोग नाही तसेच काहीसे शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ नाही. विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या घडविण्यासाठी त्यांच्यावर शालेय वयातच चांगले संस्कार होणे गरजेचे असते. आज त्याचेच प्रात्यक्षिक व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी दोन शिक्षकांचा निरोप संभारंभ अगदी नवरीच्या पाठवणी सारखा केला आहे.

बिहार लोकसेवा आयोगामार्फत मुख्याध्यापकपदावर नियुक्त झालेल्या दोन शिक्षिका दुसऱ्या शाळांमध्ये त्याची बदली होणार होती. तेव्हा शाळेच्या समुदायाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी एक अनोखा निरोप समारंभ आयोजित केला. अमिता कुमारी शिक्षिकेच्या डोक्यावर ओढणी देण्यात आली आणि राजहंस कुमार या शिक्षकाच्या गळयात हार घातला होता. अनेक विद्यार्थ्यांनी पाय पडून शिक्षिकेचे आशीर्वाद घेतले आणि गाडीपर्यंत शिक्षिकेला सोडायला गेले. यादरम्यान बरेच विद्यार्थी ढसाढसा रडतानाही दिसून आले.

शिक्षिकेसाठी अनोखा निरोप समारंभ (Viral Video)

एखाद्या लग्नात नवरीची पाठवणी करतात अगदी त्याचप्रमाणे शिक्षिकेचा निरोप समारंभ पार पडला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पारंपारिक कपडे, डायरी, हार, पेन आणि फुलांचे गुच्छ देऊन निरोप दिला. मुख्याधापक प्राचार्य श्रीकृष्ण दास यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “आजचा कार्यक्रम खरोखरच भव्य होता. शिक्षकाला अशा प्रकारे निरोप दिला पाहिजे. आज आम्हाला विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याची झलक पाहता आली. त्यांनी या जोडप्याला त्यांच्या नवीन पदांवर त्यांची निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी आणि आणखी आदर मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले हे पाहून भरून आले”.

व्हिडीओ नक्की बघा…

या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे, शाळेने केवळ दोन शिक्षकांना निरोप दिला नाही तर शिक्षक आणि शालेय समुदाय यांच्यातील मजबूत, जवळच्या कौटुंबिक नात्याचे स्वागत सुद्धा केले . नियमित निरोपाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांस्कृतिक पद्धत आणि आदर यांचे अनोखे दर्शन दिले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @j_mansi या (एक्स ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘शिक्षिकेसाठी अनोखा निरोप समारंभ आयोजित केला’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.