बसमध्ये ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही. रोज म्हंटलं तरी एकतरी भांडण प्रवासात पाहायला मिळतंच. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी सीटवरुन भांडणं होतात तर कधी भांडणाला फक्त निमित्त पुरेसं असतं. अशाच बसमधील भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भांडणात तरुणीनं जे कृत्य केलं आहे ते पाहून सर्वच संतापले आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तरुणीचा संताप येईल. असं काय केलं या तरुणीनं पाहा व्हिडीओमध्ये
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण आणि तरुणीची चालत्या बसमध्ये सीटवरुन भांडणं सुरु आहेत. यावेळी सुरुवातील बाचाबाची सुरु असलेलं हे भांडण नंतर हाणामारीला उतरतं. यावेळी दोघंही एकायला तयार नसतात. दरम्यान यावेळी तरुणी चक्क तरुणाच्या तोंडावर थुंकते. मग काय तरुणालाही राग अनावर होतो आणि तो चक्क तिला बसमधून खाली ढकलतो. आणि तरुणी बसमधून खाली पडते. यावेळी इतर प्रवासाही घाबरल्याचे दिसत आहे.
@crazyclipsonly या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून घटने नेमकी कुठली आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. काहींनी तरुणीची चूक आहे असं म्हटलंय तर काहींनी दोघांना दोषी ठरवलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> गरीबाची मोठी श्रीमंती; रणरणत्या उन्हात बसून आजीनं दिलं माणुसकीचं दर्शन; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल
अनेकांना बसचा प्रवास हा कमी खर्चीक आणि आरामदायक वाटतो. त्यामुळे बरेच जण बसने प्रवास करण्याचा आनंद घेतात. परंतु, अनेकदा बसमध्ये सीटवरुन भांडणं होतात. सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक वाहनांमध्ये काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसं राहायचं याचं अजिबात ज्ञान नसतं. कधी कधी काहींना सांगूनही ते एकत नाहीत. व्हिडीओ पाहून नक्की कोणाची चूक आहे, असा प्रश्न नेटकरी कमेंटमध्ये विचारताना दिसत आहेत.