तामिळनाडूतील एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलला शनिवारी कोईम्बतूर (Tamilnadu,Tamilnadu) येथील पोलीस नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहे. गजबजलेल्या रस्त्यावर फूड डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला कानाखाली मारताना दिसणारा हा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिंगनाल्लूर पोलिस ठाण्यातील ग्रेड-१ कॉन्स्टेबल सतीश यांनी शुक्रवारी अविनाशी रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला कानाखाली मारली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि कॉन्स्टेबलची कंट्रोल रूममध्ये ट्रांसफर केली.

३८ वर्षीय मोहनसुंदरम हे गेल्या दोन वर्षांपासून फूड एग्रीगेटर स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मोहनसुंदरम यांच्या लक्षात आले की एक खाजगी स्कूल बस चालक भरधाव वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर एका मॉलजवळ बस दोन वाहनांना आणि एका वाटसरूला धडकणार होती. त्यांनी चालकाला याबदल विचारणा करताच काही काळ वाहतूक कोंडी झाली.

(हे ही वाचा:Shocking Video: थोडक्यात बचावला ‘या’ व्यक्तीचा जीव, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ viral)

झालेली वाहतूक कोंडी बघून पोलिस कर्मचाऱ्याने शिवीगाळ करून दोनदा स्वीगी डिलिव्हरी बॉयला कानाखाली मारली, त्याचा मोबाईल हिसकावला, तसेच मोटारसायकलचेही नुकसान केले. हे सगळं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. सतीशने कथितरित्या मोहनसुंदरम यांना विचारले की शाळेच्या बसचा मालक कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का आणि वाहनांच्या वाहतुकीची समस्या उद्भवली तर पोलिस त्याकडे लक्ष देतील.

(हे ही वाचा: Viral Video: १० कुत्र्यांवर एक मांजर ठरली वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: तुमच्या ड्रीम जॉब शोधण्यासाठी मदत करेल हे Optical Illusion; ‘ही’ टेस्ट घ्या आणि उत्तर मिळवा)

पोलिसांनी सांगितले की, मोहनसुंदरम यांनी शनिवारी शहर पोलिस आयुक्त कार्यालयात केलेल्या तक्रारीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी सतीश यांची नियंत्रण कक्षात ट्रांसफर केली.