Viral Video: राज्यभरात सर्वात मोठा मानला जाणारा गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर हा अकरा दिवसांचा काळ बाप्पाच्या सहवासात कसा गेला हे कळलेच नाही. मनावर दगड ठेऊन अनंत चतुर्दशीला राज्यभरातील घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या मूर्त्यांचे विसर्जन झाले. परंतु, सोशल मीडियावर अजूनही बाप्पांच्या सुंदर मूर्त्यांचे आणि विसर्जनाचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. याच दरम्यान एका शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
हल्लीच्या शालेय शिक्षण पद्धतीत आणि पूर्वीच्या शालेय शिक्षण पद्धतीत खूप मोठा फरक पाहायला मिळतो. शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही बदल झालेले पाहायला मिळतात. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात केवळ मुलांनी अभ्यास करून यश मिळवावं हाच हेतू असायचा. परंतु, बदलत्या काळानुसार आता शाळेत मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. मुलांना काय आवडतं त्यानुसार शिक्षक आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करतात. शिवाय अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना, गाणी गाताना दिसतात.
या व्हायरल या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्हिडीओ गणेशोत्सवाच्या काळातील असून यावेळी बाप्पाची मूर्ती मधोमध ठेवण्यात आली असून बाजूने शिक्षक आपल्या विद्यार्थींनींसह “जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर” या बाप्पाच्या चर्चेत असलेल्या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.तुम्ही पाहू शकता, हा व्हिडीओ गणेशोत्सवाच्या काळातील असून यावेळी बाप्पाची मूर्ती मधोमध ठेवण्यात आली असून बाजूने शिक्षक आपल्या विद्यार्थींनींसह “जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर” या बाप्पाच्या चर्चेत असलेल्या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील v_i_s_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “एक नंबर डान्स केला सर तुम्ही”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खूपच छान”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “आम्ही कोकणात असंच नाचतो”