Viral Video: लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं आपण म्हणतो. खरंच लहान मुलं खूप निरागस आणि निर्मळ असतात. त्यामुळे त्यांना आपण जे सांगतो, जे शिकवतो, त्याच गोष्टी ते लक्षपूर्वक पाहतात आणि करतात. हल्लीचे पालक मुलं त्रास देऊ लागली की, त्यांच्या हातात मोबाईल देतात. त्यांना सोशल मीडियावरील रील्स, गाणी, विविध व्हिडीओ दाखवतात. मग काय या सर्व मनाला भुलवणाऱ्या गोष्टी पाहिल्यावर त्यांनादेखील या सर्व गोष्टींचे व्यसन लागतं. अनेक पालक तर आपल्या मुलांनीदेखील इतरांसारखा अभिनय करावा, डान्स करावा यासाठी त्यांना या सर्व गोष्टी शिकवतात.

एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं रे झालं की, सोशल मीडियावर ते खूप चर्चेत येतं. त्या गाण्यावर लोक अनेक रील्स, व्हिडीओ बनविले जातात. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना रील्स बनविल्याशिवाय राहवत नाही. सध्या गुलाबी साडी गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेकांनी रील्स बनविल्या आहेत. आता अशाच एका चिमुकल्याचा डान्स तुफान व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लहान मुलं घरातील एक समारंभामध्ये डान्स करताना दिसत आहेत. पण, या लहान मुलांमध्ये एका मुलाच्या डान्सनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा मुलगा गुलाबी साडी या प्रसिद्ध गाण्यावर सुंदर डान्स करीत आहे. सोबत कमालीचे हावभावदेखील तो दाखवीत आहे. या मुलाचे ठुमके पाहून आसपासचे लोकदेखील त्याच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. त्याशिवाय पुढे तो एका मराठी लावणीवरदेखील कमालीचा डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: याला म्हणतात डान्स! ‘पुष्पा पुष्पा’ हुक स्टेपची परदेशातही भुरळ; चीअर गर्लचा जबरदस्त डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @stories_by_roshan23 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि १२ हजारांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेकांनी हा व्हिडीओ शेअरदेखील केलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीही गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवल्या होत्या. हे रील्स सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल झाले होते. त्यात एका महिलांच्या ग्रुपनेदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून, मराठमोळ्या पद्धतीने डान्स केला होता. तसेच काही पुरुषांनी मॉर्निंग वॉकला गेल्यावर रील बनविली होती.