Viral Video: पावसाळ्याची जेवढी आपण आतुरतेने वाट पाहतो तेवढीच प्रतीक्षा प्राणी, पक्षीदेखील करतात. कडक उन्हाला केवळ माणसंच नाही तर प्राणी, पक्षीदेखील वैतागलेले असतात. अशा वातावरणामध्ये अचानक पाऊस पडल्यावर मन खूप सुखावते. अनेकांना पाऊस पडत असताना त्यात भिजायला आवडतं, तर अनेकांना पडणारा पाऊस फक्त पाहायला आवडतो. आता असाच एक मनाला आनंद देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक श्वान पाऊस पाहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, त्यावर युजर्सही अनेक मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर श्वानांचे अनेकविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये एक श्वान मोबाईलमध्ये रील पाहताना दिसतो; तर कधी श्वान खेळताना दिसतो. आता नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये श्वान पाऊस पाहण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक श्वान एका ठिकाणी निवांत बसला असून, तो बाहेर पडणाऱ्या पावसाकडे कौतुकाने पाहत आहे. यावेळी त्या श्वानाच्या बसण्याची स्टाईल पाहून तुम्हालाही हसू येईल. यावेळी व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने बॅकग्राऊंडला, “भीगी भीगी सड़कों पे मैं…” हे गाणे वाजविले आहे. या सुंदर व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: याला बोलतात डान्स! ‘अंगारों का अंबर सा…’ गाण्यावर जबरदस्त डान्स Video पाहून नेटकरी म्हणाले, “पेंटर पुष्पा..”

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Solo para Curiosos या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात कॅप्शनमध्ये, “एकदम निवांत”, असे लिहिले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास चार हजारहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील श्वानांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये एक श्वान पावसात भिजण्यासाठी स्वतःच्या मालकिणीला चकवा देताना दिसला होता.