सर्वांसाठीच लग्न हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक असतो आणि हा खास दिवस त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबत साजरा करण्याचा विचार ही एक अद्भुत भावना असते. असाच एक भावनिक क्षण एका व्हिडीओमध्ये कैद झाला असून हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचे डोळे पाणावतील हे मात्र नक्की. या इमोशनल व्हिडीओमध्ये लग्नमंडपात नवरदेव रडताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक नवरदेव स्टेजवर उभा आहे. इतक्यात नवरी डान्स परफॉर्मन्स करत लग्न मंडपात धांसू एंट्री करते. तिला पाहताच नवरदेव अचानक रडू लागतो. नवरदेव वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचतो तेव्हा नवरीने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत नवरदेवाला सरप्राईज दिलं.

गुलाबी लेहेंग्यात नवरी खूपच सुंदर दिसून येत आहे. ‘आज लगती हूं मैं तो मिस इंडिया’ या गाण्यावर नवरी थिरकताना दिसून येतेय. डान्स करता करता नवरीने रोमँटिक गाण्यावर लिप-सिंक करत नवरदेवाला स्पर्श केला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले. या व्हिडीओमधील सर्वात भावनिक भाग म्हणजे जेव्हा नवरी आपल्या होणाऱ्या पतीला रडताना पाहून त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या डोळ्यातून बाहेर येणारे अश्रू प्रेमाने पुसते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘छोरी पटाता है’ च्या रिमिक्स व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्ही पाहिलाय का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नंदीने दूध प्यायल्याची बातमी पसरताच शिवालयात भाविकांची तुंबड गर्दी, …आणि जे घडलं ते पाहून हैराण व्हाल

हा व्हिडीओ bridal_lehenga_design च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला होता. “तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचा आनंद.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. नवरदेवाला पाहून लग्नात आलेले पाहुणेही इमोशनल होतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला तीन लाख ७० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भावूक होत या व्हिडीओखाली वेगवेगळ्या कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका यूजरनं लिहिलं, इतका सुंदर क्षण कॅप्चर करण्यासाठी धन्यवाद.