सोशल मिडीयावर वेळोवेळी अनेक देव देवतांच्या प्रतिमांनी दूध प्यायल्याचे व्हिडीओ समोर येत असतात. आजच्या २१ व्या शतकात ही लोक आजही अंधश्रध्देवरती विश्वास ठेवत आहेत. राज्यातील अनेक शिवालयात नंदी दूध पित असल्याच्या अफवा अगदी वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक मंदिरात जाऊन नंदीला दूध पाजत असल्याचं समोर आलं आहे. तर तिकडे नंदीला दूध पाजण्यासाठी शिवालयात मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्याचं समोर आलं आहे. नंदीला दूध पाजण्यासाठी भाविक इतके धडपडू लागले की बघता बघता शिवालया बाहेर भाविक आक्रमक होऊ लागले. मंदिराबाहेर ही परिस्थीती इतकी हाताबाहेर गेली की पुजाऱ्यांना अखेर पोलिसांना बोलवावं लागलं.

ही घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातल्या बसडीला शिव मंदिरातल्या नंदी महाराज यांना दूध पाजण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली. यावेळी भाविक इतके आक्रमक होऊ लागले की अखेर पुजाऱ्याला मंदिर बंद करावं लागलं. गोपालगंजमध्ये गेल्या पाच दिवसांपासून शंकराचं वाहन नंदी महाराजांना दूध आणि पाणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून जवळच्या मंदिरात लोक चमच्याने नंदीला दूध आणि पाणी देताना दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ म्हणत बाप-लेकीच्या जोडीने लाखो लोकांना वेड लावलं, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

बसडिला मंदिराचे पुजारी अशोक कुमार सांगतात की, काल रात्री एक महिला भक्त मंदिरात दूध पाजण्यासाठी आली होती, त्यानंतर नंदीच्या मूर्तीचा दूध पितानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ जो जो पाहत आहेत तो मंदिराकडे धावताना दिसून येत आहेत. मध्यरात्रीपर्यंत दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नंदी महाराजांना दूध पाजण्यासाठी धक्काबुक्की झाली आणि नंतर गोंधळ सुरू झाला. मंदिरात असलेल्या शिवलिंगाला कोणतीही हानी पोहोचली नाही, त्यामुळे पुजाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. रात्री उशिरा आलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तासनतास प्रयत्न करून भाविकांना शांत केले, त्यानंतर मंदिराला कुलूप लावण्यात आले. अशीच परिस्थिती राहिल्यास मंदिरात वारंवार चकरा मारून भाविकांना शांत करणे कठीण होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.