viral video the women carried huge bundles of hay into the local like robots | Loksatta

महिलांचा करेक्ट कार्यक्रम! भलेमोठे गवताचे बंडल रोबोप्रमाणे क्षणात लोकलमध्ये चढवले; Video पाहून व्हाल थक्क

हा व्हिडीओ म्हणजे कष्टकरी महिलांच्या संघर्षाचे उत्तम उदाहरण असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

महिलांचा करेक्ट कार्यक्रम! भलेमोठे गवताचे बंडल रोबोप्रमाणे क्षणात लोकलमध्ये चढवले; Video पाहून व्हाल थक्क
या महिला एखाद्या रोबोप्रमाने रेल्वेच्या डब्यात सामान चढवत आहेत. (Photo : Twitter)

रेल्वेचा प्रवास हा सतत घडाळ्याच्या काट्यावर नजर ठेवून करावा लागतो. मुंबईसारख्या शहरामध्ये तर दररोज लाखो लोक रेल्वेतून प्रवास करतात. हा प्रवास करताना त्यांची होणारी धावपळ अनेकांनी पाहिली असेल, एवढ्या धापळीतदेखील रोज लाखो नोकरदार, कामवाले, डबेवाले आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचतात. याचं कारण म्हणजे त्यांना या प्रवासाची सवय लागलेली असते. शिवाय त्यांनी वेळेच परफेक्ट नियोजन केलेलं असतं.

सध्या इंटरनेटवर असात एक लोकलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण, लोकल कोणत्याही स्टेशनवर किती वेळ थांबते तुम्हाला माहिती आहे. एवढ्या कमी वेळात काही महिलांनी जवळपास गाडीभर गवताचे बंडल काही क्षणात लोकलमध्ये चढवले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ म्हणजे महिलांमधील काहीतरी असामान्य यांत्रिक शक्ती आहे की रोबोट? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवाय हा व्हिडीओ म्हणजे कष्टकरी महिलांच्या संघर्षाचे एक उत्तम उदाहरण असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ डीके हरी आणि हेमा या नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिला उभ्या असताना एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर येऊन थांबते न थांबते तोपर्यंत या महिला एखाद्या रोबोप्रमाने रेल्वेच्या डब्यात सामान चढवायला सुरुवात करतात आणि काही क्षणात भरधाव वेगाने गाडीत सामान चढवतातही त्यांच्या कामाचे स्पीड बघून नेटकऱ्यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “वेळेत ध्येय गाठण्याचे हे उत्तम उदाहरण, स्त्री शक्तीचे कौतुक करा.” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यानी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहलं आहे की, स्त्रिया किती अद्भुत आणि गतीमान असतात हेच यातून दिसतं आहे. तर अशा प्रकारे गडबड करत असताना स्वताची काळजी घ्यायला हवी अन्यथा दुर्घटना घडू शकतात असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:37 IST
Next Story
Viral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल