Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ पाहून आपला थरकाप उडतो. कधी कोणी त्यांच्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात, तर काही लोक मनोरंजनासाठी कंटेंट तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. हल्ली अनेक जण सार्वजनिक ठिकाणी लोकांबरोबर विविध प्रँक करतात, ज्यामुळे अनेक गमतीशीर घटना कॅमेरात कैद केल्या जातात.

हल्ली सोशल मीडियामुळे प्रँक करणाऱ्यांचा ट्रेंड वाढत चालला आहे. यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची ते मस्करी करताना दिसतात. अशी मस्करी अनेकांना खळखळून हसवते, तर अनेकांना घाबरवते. तसेच या प्रँकमुळे प्रँक करणाऱ्या व्यक्तीला मारदेखील खावा लागतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटली. लोक सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाली, तरीही आजही देशात जादूटोणा, भूत-प्रेत अशा विविध गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि अंधश्रद्धेला बळी पडतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्याच्या फुटपाथवर एक व्यक्ती हळद-कुंकू टाकून त्यावर पाचशे रुपयांची नोट आणि त्यावर लिंबू ठेवतो. त्यानंतर दूरवर जाऊन उभा राहून ती पाचशेची नोट कोण उचलतय की नाही हे पाहतो. यावेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक त्या पैशांकडे पाहून दुर्लक्ष करतात, तर अनेक जण हळद-कुंकू, लिंबू पाहून घाबरतात. हा प्रँक व्हिडीओ तयार करण्यामागे लोक आजही अंधश्रद्धा मानतात की नाही हे पाहायचे होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @prank_maza_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “अजूनपण या देशात इतकी अंधश्रद्धा आहे, दुर्भाग्यपूर्ण”, असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर एका युजरने लिहिलंय की, “हा experiment खूपच गरजेचा होता, कारण जे लोक असं बोलतात की, ही सगळी अंधश्रद्धा आहे, भूत प्रेत, जादूटोणा, मूठ, करणी हे सगळं खोटं आहे.”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मी असते तर नक्की उचलले असते”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “मी असतो तर ५०० पण उचलले असते आणि लिंबाचे लिंबू सरबत करूनपण प्यायलो असतो”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मी जर तिथे असतो तर नक्की उचलले असते पैसे.”