Bird Can Perfectly Mimic Sound Of Children Cries : जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. कधी कधी काही प्राणी आणि सृष्टी पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. हे नक्की काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकताही लोकांमध्ये असते. हल्ली एक वेगळाच आवाज असलेला पक्षी पाहून लोक असेच काहीसे बोलत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक पक्षी प्रचंड व्हायरल होतोय. त्याचा आवाज ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. खरं तर, हा पक्षी मानवी मुलांप्रमाणेच रडतोय. इंटरनेटवर या पक्ष्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर प्रत्येकजण थक्क झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गाची अनेक रूपे आहेत, ज्यावर कधी कधी आपला विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे, जो पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर प्रत्येकजण थक्क झाला. हा व्हिडीओ लहान मुलांसारखा रडणाऱ्या पक्ष्याचा आहे. हे पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की पक्ष्याचा आवाजही असा असू शकतो. हा व्हिडीओ सिडनीच्या @Taronga प्राणीसंग्रहालयाच्या ट्विटर हँडलने शेअर केला आहे, ज्यामध्ये एक पक्षी बाळाच्या रडण्यासारखा आवाजात ओरडत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : भारतात समुद्रातून बांधलाय ‘वॉटर हायवे’? जाणून घ्या या VIRAL VIDEO मागचं सत्य

लिरेबर्ड नावाचा हा पक्षी लहान बाळाप्रमाणे रडतो. याशिवाय अनेक आवाजही काढू शकतात. लिरेबर्ड हा पक्षी कोणताही आवाज ओळखण्यात पटाईत असतो आणि त्याची बर्‍याच प्रमाणात कॉपी करतो. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्ष्याचा हा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तलवारीने केक कापणे महागात पडले; १९ वर्षाच्या बर्थ डे बॉयविरोधात गुन्हा दाखल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ना लाल माती, ना फड, पण या दोन हरणांची कुस्ती जबरदस्त, पाहा VIRAL VIDEO

लोक ही व्हिडीओ क्लिप फक्त एकमेकांना शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रियाही देत ​​आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video this bird can perfectly mimic sound of children cries voice watch surprising video of lyrebird prp
First published on: 21-09-2022 at 18:24 IST