प्राण्यांच्या मजेदार कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. सोशल मीडिया यूजर्सना हे व्हिडीओ खूप आवडतात. असे अनेक व्हिडीओ आहेत जे आपल्या मनात घर करून जातात. तर अनेक व्हिडीओ असेही असतात, जे आपल्याला मनात बसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गोंडस आणि गुबगुबीत माकडाचा आहे. पण या व्हिडीओमधलं माकड इतकं गोंडस आहे की त्याला फक्त पाहावंच वाटतं.

या व्हिडीओमधलं एक माकड बसलेलं दिसतंय. त्याच्या चेहऱ्यावर गोंडसपणा अगदी स्पष्टपणे दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये कधी तो आपले डोळे मिचकावत पाहतो तर कधी उगाच जमिनीवर आपल्या हातांनी काहीतरी रेखाटत बसतो. तर कधी झाडावरची फळं खातो. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं आणखी एक कारण कळल्यानंतर लोकांचं मन थोडं दुःखी होतं. हा व्हिडीओ काहीसा निरखून पाहिला की ते माकडे जे काही करतं ते एकाच हाताने करताना दिसतोय. होय. या माकडाला दुसरा हात नाही. त्यामुळे तो इतर माकडांसारखं दोन्ही हातांवर उड्या घेत खेळू शकत नाही. म्हणून हे माकड इकटंच खाली बसलेला दिसत आहे. कमी व्यायामामुळे थोडे गुबगुबीत झालेल्या माकडाला पर्यटक खायला घालताना दाखवले आहेत. एक माणूस शांतपणे बसलेला माकडाला प्रेमाने पाजताना दिसत होता.

आणखी वाचा : याला म्हणतात टीम वर्क! हा VIRAL VIDEO एकीचे बळ दाखवतो…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काचेसारखा चकाकणारा ऑक्टोपस कधी पाहिलाय का? पाहून लोक आश्चर्यचकित झाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ naturreandanimals_being_epic नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाख ३९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. कुणी या गोंडस माकडाचं कौतूक करत आहेत. तर कुणी या माकडाला एक हात नसल्याचं दुःख व्यक्त करत आहेत.