Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. मग स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत; मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. असाच एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तरुण धावत्या बाईकवर पाठिमागे चित्र विचित्र स्टंट करताना दिसत आहे. मात्र याचा शेवट इतका भंयकर झालाय की बघूनच अंगावर काटा येतो.

त्यानं भरदाव पळणाऱ्या बाईकवर असे असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक काय करतील याचा नेम नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण धावत्या बाईकवर पाठीमागे बसून उभा राहून स्टंटबाजी करत आहे. कधी हवेत पाव वर करतोय तर कधी एका पायावर उभा राहतो. यावेळी तो आजूबाजूला बघून हसतानाही दिसत आहे मात्र पुढे काय घडणार आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नाहीये. दरम्यान स्टंटबाजी करताना त्याचा अचानक तोल जातो आणि भर वेगात असणाऱ्या बाईकवरुन तो थेट तोंडावर पडतो. आता ही स्टंटबाजी त्याला चांगलीच महागात पडली आहे. अक्षरश: रस्त्यावर तोफरपटत जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अंदाज येतो की त्याला किती जोरात लागलं असेल.

accident cctv footage
Video: चालताना फोनवर बोलणाऱ्या वृद्धाचा मोबाईल चोरट्यानं हिसकावला, रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत मत्यू; CCTV फूटेज व्हायरल!
potholes filling with rainwater on the hinjewadi wakad service road
पुण्यात रस्त्यावर खड्डे अन् खड्यामध्ये पाणी; हिंजवडी वाकड सर्व्हिस रोडवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
Spiderman in Pune Clogged water on the road
‘अरे हे काय सुरू आहे पुण्यात!’ जेव्हा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात स्पायडरमॅन उतरतो तेव्हा….. Viral Video पाहून पोटधरून हसाल
A bull reached the roof of the police station
अरे बापरे! पोलिस ठाण्याच्या छतावर पोहोचला चक्क बैल; कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, पुढे जे घडलं… Video पाहून कपाळावर माराल हात
a young guy merged toilet with a scooter jugaad video goes viral
तरुणाने स्कुटीला लावला चक्क कमोड, जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल; VIDEO होतोय व्हायरल
a young man doing stunt while driving bike on a road
भररस्त्यावर स्टंटबाजी पडली तरुणाला महागात! पुढच्याच क्षणी दुचाकीसह धाडकन आपटला, VIDEO व्हायरल
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
a woman walking on rope way on a high in a deep valley
बापरे! खाली खोल दरी अन् दोरीवरुन तोल सावरत चालतेय तरुणी, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जबरदस्ती नाच म्हणाल्यामुळे नवरदेवाला आला राग, रागावलेल्या नवऱ्यानं केलं असं काही की…नेमकं काय घडलं?

ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय की, भाऊ त्याला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे. आणखी एका युजरने लिहिलेय की, याला म्हणतात मृत्यूशी खेळणं.आणखी एका युजरने लिहिले की, क्षणभर असे वाटेल की, आता संपलं सगळं. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूप धोकादायक व्हिडीओ.’ त्याच वेळी तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘लोकांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही.’