viral video Uber driver : ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसपेक्षा एअर कंडिशनिंगची ओला, उबर, एसी ट्रेन किंवा बस या उन्हात प्रत्येक नागरिकासाठी सोईस्कर ठरते. ओला-उबर बुक करायची करून काही वेळात ती दारापाशी येते आणि प्रवास सुरू होतो. यादरम्यान ड्रायव्हरशी अनेकदा पैशांवरून, चुकीच्या रस्त्यावरून नेल्यामुळे वाद होत असतात. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत नोएडामधील एका कुटुंबासाठी नेहमीचा कॅब प्रवास भयानक ठरला.
१४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रवासी संजय मोहनने नेहमीप्रमाणे उबर कॅब बुक केली होती. प्रवासी त्यांच्या पत्नी व मुलीबरोबर ग्रेटर नोएडा वेस्टहून कॅनॉट प्लेसला जात होते. प्रवास सुरू झाला आणि अचानक उबर ड्रायव्हरने पोलिस तपासणी चुकवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर वेगाने गाडीसुद्धा पळवू लागला. प्रवासी आणि त्यांची पत्नी ड्रायव्हरला थांबण्याची विनंती करीत असल्याचेही व्हिडीओत दिसते आहे.
प्रवासी संजय मोहनने या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पोलिसांच्या इंटरसेप्टर वाहनाने ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले; पण त्याने थांबवले नाही. घटनेदरम्यान प्रवासी संजय यांची मुलगी घाबरली होती. नंतर वारंवार विनंती आणि आरडाओरडा केल्यावर त्याने गाडी रस्त्याकडेला थांबवली. मोहन प्रवासी यांनी दावा केला की, कारचा यापूर्वीही अपघात झाला होता.
व्हिडीओ नक्की बघा…
एक वेळ कमी खा; पण तुमच्या कुटुंबासाठी स्वतःची कार खरेदी करा (Viral Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sanmohan4u या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “@Uber @Uber_Support बरोबरचा एक धक्कादायक अनुभव. आज मी आणि माझे कुटुंब नोएडाहून सीपीला जात होतो. नोएडा येथील पार्थला ब्रिजजवळ पोलिसांच्या एका इंटरसेप्टर वाहनाने ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले; पण ड्रायव्हर थांबला नाही आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता,” अशी घटनेची सविस्तर माहिती प्रवाशाने पोस्टमध्ये दिली आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच उबर कंपनीने मोहनच्या व्हायरल पोस्टला उत्तर देत, “नमस्कार, कृपया तुमच्या उबर अकाउंटशी संबंधित तुमचा नोंदणीकृत फोन नंबर आणि ईमेल आयडी शेअर करा. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू”, अशी कमेंट केली आहे. त्यानंतर उबर ड्रायव्हरला अटकसुद्धा केली. पण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचाही संताप झाला आहे. “अशा घटना मुलांच्या मनावर दीर्घकाळ छाप सोडून जातात”, “एक वेळ कमी खा; पण तुमच्या कुटुंबासाठी स्वतःची कार खरेदी करा” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.