Viral video: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भायवह अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. डान्स रिल्सचे तर अनेक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये अगदी वयोवृद्ध लोक देखील भन्नाट अशा एक्सप्रेशन आणि स्टेप्ससह डान्स करत असतात. सध्या असाच एक काकांच्या डान्सचा भन्नाट असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही आजकाल अनेक वयस्कर लोकांना देखील डान्स करताना पाहिलं असेल अशाच एका काकांनी हळदीला भन्नाट डान्स केला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, जबाबदाऱ्या तर आयुष्यभर संपणार नाहीत संधी मिळेल तेव्हा असा आनंद लुटता आला पाहिजे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या काकांनी एक हळदीच्या कार्यक्रमात “त्या नटीनं मारली मिठी मला गं त्या नटीनं मारली मिठी ” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या काकांनी मराठी गाण्यावर असा ठेका धरलाय आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल.
पाहा व्हिडीओ
काकांचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ mgcmatic या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दत आहेत. एकानं म्हंटलंय की, अशं जगता आलं पाहिजे तर आणखी एकानं वाह क्या बात भारीच अशी प्रतिक्रिया दिली आहे.
