Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध व्हायरल व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेत येतात. नुकताच गणेशोत्सव पार पडला. त्यामुळे त्यादरम्यानचे अनेक व्हिडीओ खूप चर्चेत आले. त्याशिवाय बाप्पाची नवी-जुनी गाणीदेखील चर्चेत आली. त्यातीलच एक नवं गाणं म्हणजे ‘आमच्या कोकणचो रुबाब भारी’ हे गाणं खूप चर्चेत होतं. या गाण्यावर कोकणातील अनेकांनी विविध पद्धतींनी सुंदर रील्स बनवल्या. त्यात काही तरुणींनी साडी नेसून, तर काही तरुणींनी साध्या पद्धतीनं सुंदर रील्स बनवल्या. दरम्यान, आता मुलं या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

गणेशोत्सव आणि कोकण यांचं एक अनोखं समीकरण आहे. त्यामुळे चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून आपल्या कोकणातल्या गावी जातात. त्यात कोकणाचा आणि कोकणातील गणपती सणाचा उल्लेख करणारं एक सुंदर गाणं खूप चर्चेत आलं आहे; ज्यात चार मुलं सुंदर डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यातील प्रत्येक सुंदर वाक्यावर ही मुलं भन्नाट स्टेप्सही करताना दिसत आहेत.

या गाण्यात “कोकणचो रुबाब भारी, माझ्या कोकणचो तोरो भारी, कोकण चिपळूण-सावंतवाडी माझ्या कोकण गावाचो दिमाख भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी. दमादमानं हाका गाडी, माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. मुंबई-पुण्याचे रस्ते सोडा, माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी”, असे सुंदर शब्द ऐकायला मिळत आहेत.

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @kaudi_gang या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन दशलक्ष व्ह्युज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: पोरी तुझा नाद खुळा! हिंदी गाण्यावर चिमुकलीचे जबरदस्त ठुमके; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय, “व्वा खूपच भारी व्हिडीओ.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूपच सुंदर.” आणखी एकानं लिहिलंय, “व्हिडीओतील लहान मुलगा खूप सुंदर नाचतोय.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “मस्त! आमचं कोकण आहेच खूप सुंदर.”