Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर शाळेचे सुद्धा अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. शाळेतील हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपल्याला सुद्धा बालपण आठवते, शाळेचे जुने दिवस आठवते. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मराठी शाळेतील विद्यार्थीनीची अनोखी कला दिसून येईल. ही चिमुकली विद्यार्थीनी चक्क दोन्ही हातांनी एकाच वेळी एकाच वेगाने लिहिते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला शाळकरी विद्यार्थी दिसेल. हे शाळकरी विद्यार्थी अभ्यास करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला एक चिमुकली दिसेल जी दोन्ही हातानी एकाच वेळी सारख्याच वेगाने लिहितेय. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ती दोन्ही हातानी अचूक पाढे लिहितेय. एक विद्यार्थीनी चक्क मराठी शब्दांची मिरर इमेज सुद्धा लिहितेय. तेथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही कला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. मराठी शाळेतील हे हुशार विद्यार्थी पाहून कोणीही थक्क होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “मराठी शाळा, खरंच या चिमुरड्या विद्यार्थ्यांमधील असलेली ही कला बघण्यासारखी आहे”
ही शाळा त्र्यंबकेश्वर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेवश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जि.प ची शाळा आहे.

हेही वाचा :शेतकऱ्यांनो तुम्हीही कांद्याचं पिकं घेतलंय का? वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

tr_teju_madhe’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अतिशय सुंदर अशी कला आहे या चिमुकल्यांमध्ये…”

हेही वाचा : धावत्या ट्रेनमध्ये सिगारेट, विडी ओढणाऱ्यांनो हा धक्कादायक VIDEO एकदा पाहाच! प्रवासावेळी घडू शकते अशी भयानक घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इंग्रजी भाषेत शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषेत शिकणाऱ्या मुलांचा हा गुण शिकून घ्यावा” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान… अशी शाळा सगळीकडे असेल तर खूप छान होईल” आणखी एका युजरने लिहिलेय, “मराठी शाळांचा नाद नाही करू शकत इंग्लिश माध्यमाच्या शाळा” एक युजर लिहितो, “हे फक्त मराठी शाळेतच होऊ शकतं प्रायव्हेट स्कूलमध्ये हे चॅलेंज कोणीही स्वीकारून दाखवावं” तर एक युजर लिहितो, “अप्रतिम शिकवण सर “