Viral Video Wife Surprised Husband With His Dream Gift : मुलांसाठी बाईक म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. स्कुटीपासून सुरू होणारा मुलांचा प्रवास त्यांना बुलेट, केटीएम, आर15 अशा बाईकपर्यंत घेऊन जायचा असतो. पण, स्वतःचा खर्च, घरच्यांना घरखर्चाला पैसे देणे यासगळ्यात त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करायला पैसाच उरलेला नसतो. मग कधी कधी ही स्वप्ने ही मुले त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोला सांगतात. मग बायको नकळत नवऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. आज असेच काहीसे दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

कॅप्शननुसार १२ वर्षांपासून अनिकेत आणि त्याची बायको आद्या एकत्र राहत आहेत. अनिकेतच्या प्रत्येक बर्थडेला आद्या न चुकता, त्याला उपयोगात येतील अशी गिफ्ट्स देते. तसेच १२ वर्षांपूर्वी या गिफ्ट्सची सुरुवात गुलाब आणि कॅडबरीपासून झाली होती. मग नंतर त्यात कपडे, वॉच, आयपॅड अशा वेगवेगळ्या गिफ्ट्सचा समावेश झाला. अनिकेतची बायको सरप्राईज गिफ्ट देण्यात माहीर आहे आणि या गिफ्टबद्दल अनिकेतला शेवटपर्यंत कळायचेसुद्धा नाही. पण, या वर्षी आद्याने दिलेले गिफ्ट पाहून अनिकेतला एकदम भरून आले.

एवढ कोण करता यार समोरच्यासाठी (Viral Video)

व्हिडीओच्या सुरुवातीला आद्या आणि काही मित्र-मैत्रिणी मिळून अनिकेतच्या डोळ्यांवर पट्टी बांधतात. त्यानंतर बाईकच्या शोरूममध्ये अनिकेतला घेऊन जातात. आद्या डोळ्यांवरची पट्टी काढते आणि अनिकेत समोर बाईक बघून थक्कच होऊन जातो. त्याला काय बोलावे, कशी प्रतिक्रिया द्यावी कळतच नव्हते. त्याला एकदम भरून येते. त्यानंतर तो बाईकवर बसून आनंदाने, मजेशीर एक डान्स करतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @cinematographer_aniket या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनिकेतने बायकोचे कौतुक करत “डिअर वाईफ, ॲक्टिव्हावरून फिरताना मला कुठेही ‘Triumph ४००’ बाईक दिसली की, मी तुला नेहमी बोलायचो ही बाईक मस्त आहे. घेऊया आपण, आपल्याला पॉसिबल होईल तेव्हा. पण, तू एवढ्या लवकर ते पॉसिबल करशील, असं वाटलंच नव्हत. हे गिफ्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त स्पेशल आहे. कारण- माझ्या सांगण्यावरून तू तुझा वेल सेटल जॉब सोडलास आणि माझ्या बरोबर फोटोग्राफीमधे जॉईन झालीस. Initial learning stage ला जे काही थोडे पैसे मी तुला देत होतो, त्यातला एक पैसाही तू स्वतःवर खर्च न करता सर्व सेव्हिंग तू बाईकसाठी केलीस. मी आजपर्यंत तुझ्याइतकी सेल्फलेस व्यक्ती कधीच बघितली नाही. मला तुझ्या काही सूत्रांकडून कळलं की, तू हे सर्व प्लॅनिंग मागच्या एक वर्षापासून करत होतीस. एवढं कोण करतं यार समोरच्यासाठी… खूप खूप खूप थँक यू” अशी डोळे पाणावणारी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.