Viral Video: समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात; ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक व्हाल.

या जगात मनुष्यापासून पशू-पक्ष्यांपर्यंत प्रत्येक जण संघर्षमय आयुष्य जगत असतो. मनुष्य आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र झटतो. त्याचप्रमाणे प्राणी, पक्षीदेखील त्यांच्या आयुष्यातील भूकेसह अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी काही ना काही करीत जीवनसंघर्ष करताना दिसतात. प्राण्यांच्या आयुष्यातील अनेक न पाहिलेल्या गोष्टी जंगलातील व्हिडीओंमुळे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात काही जंगली कुत्रे म्हशींवर हल्ला करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामधून ३०-३५ म्हशींचा एक कळप जात असून यावेळी ८-९ जंगली कुत्र्यांचे त्या कळपावर लक्ष जाते. कळपातील काही म्हशी पुढे गेल्याचे पाहून कुत्र्यांचा कळप मागे राहिलेल्या काही म्हशींवर एकत्र हल्ला करतो. यावेळी कुत्र्यांचा कळप एक म्हैस आणि तिच्या पिल्लाला आपल्या तावडीत पकडतात. अनेक प्रयत्न केल्यानंतर म्हैस त्यांच्या तावडीतून सुटते, परंतु पिल्लू अडकून राहते. जंगली कुत्रे पिल्लाचे लचके तोडून त्याला आपली शिकार बनवतात.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत १७ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “मी वाचले आहे की आफ्रिकन जंगली कुत्र्यांमध्ये शिकार यशस्वी करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “म्हशींचा कळप पण आपल्या नातेवाईकांसारखा आहे”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “म्हशीला तिच्या शक्तीची कल्पना नाही.”