Viral Video Woman Launches First Divorce Camp : घटस्फोट एक अशी प्रक्रिया आहे; ज्याच्यामुळे फक्त पती-पत्नीच नव्हे, तर दोन परिवारदेखील एकमेकांपासून दूर होतात. त्यामुळे पूर्वी संसार मोडण्याचा निर्णय अगदी टोकाचा मानला जायचा. पण, सध्या छोट्या छोट्या कारणांवरून जसे की, एखाद्याचा स्वभाव, एखाद्याची सवय जरी खटकली तरीही जोडपी विभक्त होताना दिसतात. पण, कारण काहीही असो घटस्फोटाच्या निर्णयामुळे फक्त भावनिक स्तरावरच नव्हे, तर आर्थिक पातळीवरदेखील जीवनात अनेक बदल होतात. त्यामुळे हा बदल आणि होणारा मानसिक ताण दूर करण्यासाठी एका महिलेने खास गोष्ट केली आहे.

घटस्फोटाचा विषय आला की, अनेक वेळा महिलांच्या अधिकारांविषयी चर्चा केली जाते. ‘ब्रेक फ्री स्टोरीज’ नावाच्या इस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये दाखवण्यात आले आहे की, केरळमध्ये डिव्होर्स कॅम्प उघडण्यात आला आहे. इथे घटस्फोटित, विभक्त किंवा विधवा महिलांसाठी एक सुरक्षित जागा तयार करण्याचा निर्णय एका महिलेने घेतला आहे. त्यांना इतरांशी जोडण्यास, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी सांगण्यास, त्यांच्या आयुष्यातील आनंद पुन्हा शोधण्यास मदत करणे हा यामागील उद्देश होता. निसर्गाच्या कुशीत हा कार्यक्रम झाला आणि त्यात विविध उपक्रमांचा समावेश होता.

आम्ही मुक्त झालो (Viral Video)

अनेकदा घटस्फोटित महिलांना दोषी ठरवले जाते किंवा दुर्लक्ष केले जाते. पण या अनोख्या कॅम्पने महिलांना आत्मविश्वास दिला. या कॅम्पने सर्वांना आठवण करून दिली की, विभक्त झाल्यानंतरही जीवनात प्रेम, हास्य व आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची ओढ असते. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहिले असेल की, घटस्फोटित, विभक्त किंवा विधवा महिला नाचताना, गाताना, हसताना आणि नवीन नाती निर्माण करताना दिसत आहेत. काही महिलांनी डोळे बांधून, त्यांचे वैयक्तिक अनुभव शेअर केले. त्यांना निर्णयाची भीती न बाळगता, मोकळेपणाने बोलता येईल अशी जागासुद्धा निर्माण केली होती.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @cook_eat_burn आणि @breakfree_stories या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि ‘आम्ही मुलांसारखे हसलो. आम्ही रडलो. आम्ही डोंगरात जाऊन ओरडलो. आम्ही रात्री आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांखाली नाचलो. आम्ही अशा गोष्टी शेअर केल्या, ज्या दुसऱ्या कोणालाही समजल्या नाहीत. अनोळखी माणसं सोल सिस्टर्स (soul sisters) बनली आणि बघता बघता बोनफायर्स आणि ब्रेकथ्रूजदरम्यान… आम्ही मुक्त झालो’, अशी सुंदर कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.